Protesting the demolition of the Ahilya ghat, they went down to the Godavari river bed and protested esakal
नाशिक

Nashik Goda Ghat : अहिल्यादेवी शक्ती दे, गोदाघाटाला मुक्ती दे! घाटाच्या तोडफोडीबद्धल रामतीर्थावर निषेध आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रामतीर्थ परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार केलेल्या घाटाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. २०) दुपारी गोदापात्रात जलाधिवास आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनात शहरातील प्रमुख हिंदुत्ववादी संघटनांसह काँग्रेस, शिवसेना साधू महंत, गोदाप्रेमींनी गोदापात्रात उतरून निषेध आंदोलन केले. (Protest movement at Ram Tirtha against vandalism of goda ghat)

या वेळी ‘अहिल्यादेवी शक्ती दे, गोदाघाटाला मुक्ती दे’ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सध्या गोदाघाटावर गंगा गोदावरी पुरोहित संघ व गोदावरी सेवा समिती अशा दोघांकडून सायंकाळी महाआरती सुरू आहेत. यातील गोदावरी सेवा समितीच्या आरतीसाठी दुतोंड्या मारुतीजवळील कुंडालगत चार ते पाच चौथरा उभारण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.

या कामासाठी मागील आठवड्यात घाटावरील काही पायऱ्या काढल्यावर पुरोहित संघासह अनेकांनी विरोध करत हे काम बंद पाडले. त्याविरोधात शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांसह विविध पक्षांतर्फे गोदापात्रात उतरून आंदोलन छेडण्यात आले होते. या वेळी गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, माजी आमदार वसंत गिते.

माजी महापौर विनायक पांडे, काँग्रेस नेते राजेंद्र बागूल, विजय राऊत, बबलू खैरे, महंत रामसनेहीदास, महंत भक्तीचरणदास, चंद्रशेखर पंचाक्षरी, महेश महंकाळे, महंत अनिकेतशास्त्री, कल्पना पांडे, धनगर विकास परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, सचिन बांडे, अमित पंचभय्ये, सदानंद देव, संतोखदास महाराज, सदानद देव, सोनल गायधनी, रागेश्री देशपांडे, प्रदीप देशमुख, सुमंत वैद्य, प्रतीक शुक्ल आदी सहभागी झाले होते. (latest marathi news)

आंदोलनात सहभागी संघटना

जलाभिषेक आंदोलनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, पंचवटी सिटिझन फोरम, गंगा गोदावरी पुरोहित संघ, हिंदू जनजागृती समिती, आखाडा परिषद, हिंदू एकता आंदोलन पक्ष, विविध आखाड्यांचे साधू-महंत, सरदार चौक मित्र मंडळ ट्रस्ट, गोदाप्रेमी सेवा समिती, महाराष्ट्र संत सेवा समिती, अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद समिती, आदिवासी जीवरक्षक दल.

"गोदाघाट बचाव आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे. घाटावरील चौथरा बांधण्यास स्थानिक आमदारांसह स्मार्टसिटी, राज्य शासन जबाबदार आहे. घाट तोडणे हा अहिल्यादेवी होळकर, न्यायालय, सनातन धर्म, सिद्ध पुरुषांचा अपमान असून याचा निषेध करतो." - महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, अध्यक्ष, अ. भा. संत समिती

"पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटांची स्मार्टसिटीने यापूर्वीच मोडतोड केली आहे. यापुढे पुन्हा मोडतोड सहन केली जाणार नाही." - राजेंद्र बागूल, माजी नगरसेवक

"गोदाघाटावर बेकायदा उभारण्यात येत असलेल्या दगडी चौथ-यांना विरोध आहे, कारण यामुळे शाही स्नानास अडथळे निर्माण होणार आहे. घाटाची तोडफोड करून चौथरा उभारण्यास शेवटपर्यंत विरोध करू." - सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ

"शहराच्या अनेक भागात स्ट्रीट लाइट नाही, पिण्यासाठी पाणी नाही, रस्ते नाहीत. दुसरीकडे स्मार्टसिटीचा पैसा वापरून गोदाघाटावर चुकीची कामे सुरू आहेत, त्याचा निषेध" - विजय राऊत, अध्यक्ष, महाराष्ट काँग्रेस ओबीसी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT