In front of the entrance of Rajiv Gandhi Bhavan, vendors throwing vegetables against the unfair action taken by the encroachment department against the vegetable vendors. esakal
नाशिक

Nashik Protest News : आकाशवाणी टॉवरच्या भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

Nashik Protest : प्रवेशद्वारावर भाजीपाला आणून टाकत अतिक्रमण विभागाने अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप करत ठिय्या घातला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Protest News : गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर येथील भाजी विक्रेत्यांनी शुक्रवारी (ता.१९) पुन्हा एकदा महापालिका मुख्यालयासमोरील प्रवेशद्वारावर भाजीपाला आणून टाकत अतिक्रमण विभागाने अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप करत ठिय्या घातला. हॉकर्स झोन जाहीर होत नाही, तोपर्यंत विक्रेत्यांना आहे त्याच जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (Nashik Protest of Vegetable vendors of Akashwani tower marathi News)

महापालिकेच्यावतीने शहरात हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात आली. परंतु हॉकर्स झोन समितीची निवडणूक प्रलंबित आहे. त्यामुळे झोनची घोषणा होऊनही विक्रेत्यांना जागा ताब्यात घेण्यात आली नाही. परंतु असे असताना देखील महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने भाजी विक्रेत्यांवर शहरात कारवाई सुरू आहे. मेनरोड, रविवार कारंजा, भद्रकाली या भागात रस्त्यावर सर्रासपणे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. दुसरीकडे मात्र भाजीपाला जप्त करण्याची कारवाई सुरु आहे.

गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर जवळ काही दिवसांपूर्वी भाजी विक्रेत्यांचा माल जप्त करून त्यांना त्या जागेवरून पिटाळले. त्या विरोधात भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांनी पालिका मुख्यालयासमोरील प्रवेशद्वारा समोर भाजीपाला ओतून पालिका प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. या परिस्थितीत शेतकरी व शेतमाल विकणारा भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे.

ती थांबवावी, आकाशवाणी टॉवर तसेच शिवाजीनगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, सिडको या भागात भाजी विक्रेत्यांना हक्काचा व्यवसाय करण्यासाठी हॉकर्स झोनची जागा तत्काळ उपलब्ध करून द्यावी. जोपर्यंत होकर्स झोनची जागा मिळत नाही. तोपर्यंत भाजी विक्रेत्यांना त्याच जागेवर व्यवसायासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

अतिक्रमणवर हप्तेखोरीचा आरोप

अतिक्रमण विभागाकडून भाजी विक्रेत्यांवर कारवाई करताना हप्ते घेतले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. अतिक्रमण विभागाने हप्ते खोरी बंद करावी अशी आग्रही मागणी देखील यावेळी भाजी विक्रेत्यांच्या नवसंघर्ष संघटनेने केली. संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन मुर्तडक, शहराध्यक्ष समाधान अहिरे, सुरेश टर्ले, राजू घोरपडे, प्रणव बनसोडे, सविता सांगळे, मारुती वराडे, कल्पना भावसार, वैभव भावसार, काशिनाथ कामडी, शुभम गांगुर्डे, सुनील तुपे, भूषण अहिरे, निवृत्ती गायकवाड, संजय शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT