Retired Additional Director General of Police Sanjay Kumar esakal
नाशिक

Nashik PSI Convocation Ceremony : आज घेतलेल्या शपथेचे सदैव स्मरण ठेवा : संजय कुमार

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्‌ये बुधवारी (ता. १७) सकाळी १२३ व्या खात्यांतर्गत सेवेतील प्रशिक्षार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी संजय कुमार बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : समाजामध्ये नवीन जबाबदारी घेऊन जात आहात. समाजातील अन्याय, अत्याचाराविरोधात गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याची मुख्य जबाबदारी पार पाडत असताना, अडचणीच्या प्रसंगी वा मार्ग सापडत नसेल त्यावेळी आज घेतलेल्या शपथेचे सदैव स्मरण करा.

तुम्हाला मार्ग तर सापडेलच, शिवाय तुम्हाला सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी केले. (Nashik PSI Convocation Ceremony Sanjay Kumar statement Always remember oath taken today)

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये बुधवारी (ता. १७) सकाळी १२३ व्या खात्यांतर्गत सेवेतील प्रशिक्षार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी संजय कुमार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश मोर उपस्थित होते.

यावेळी संजय कुमार म्हणाले, जी जबाबदारी घेऊन तुम्ही जात आहात, ती फार महत्त्वाची आहे. प्रत्येकवेळी तुमच्या निर्णयक्षमतेचा कस लागणार आहे. त्यावेळी तुमच्या ज्ञानाचा आणि मानसिक सदृढतेचाही कस लागेल.

तुमच्या निर्णयाची अनेकांचा प्रतिक्षा असते. त्यावर त्यांचे पुढचे काम असते. त्यामुळे प्रत्येक वेळी मानसिक सदृढता सिद्ध करता आली पाहिजे. आजच्या काळात भ्रष्टाचार मोठी समस्या आहे. सामाजिक भान राखून तुम्हाला यातून मार्गक्रमन करावयाचे आहे.

अशावेळी कोणतेही चुकीचे पाऊल तुमच्याकडून पडणार नाही याचेही भान राखता आले पाहिजे. आगामी काळात सायबर गुन्ह्यांचे आव्हान आहे.

तसेच लोकसभा निवडणूकाही आहेत. अशावेळी जबाबदारीने काम करावे लागणार आहे. मात्र, पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. मनावर नियंत्रण ठेवून आनंदी राहिल्यास शारीरिक तंदुरुस्तीही टिकून राहते असेही संजय कुमार म्हणाले.

राजकारण्यांची पाठ

ऐरवी दीक्षांत सोहळ्यासाठी राजकीय लोकप्रतिनिधींच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची भाऊगर्दी होत असते. यावेळी मात्र, एकाही लोकप्रतिनिधींची दीक्षांत सोहळ्यासाठी हजेरी लावली नाही.

कदाचित गृहमंत्री वा राज्य गृहमंत्री या सोहळ्यासाठी आले असते, तर झाडून लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांसाठी हजर झाले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT