Nashik NMC esakal
नाशिक

Nashik NMC : गंगापूर रोडची संरेषा बदलण्यासाठी सूचना!

Nashik News : १९९३ पासूनच्या विकास आराखड्यात समावेश असलेल्या गंगापूर रोडची संरेषा (अलायमेंट) बदलण्यासाठी महापालिकेकडून गुरुवारी (ता. २३) जाहीर सूचना काढल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : १९९३ पासूनच्या विकास आराखड्यात समावेश असलेल्या गंगापूर रोडची संरेषा (अलायमेंट) बदलण्यासाठी महापालिकेकडून गुरुवारी (ता. २३) जाहीर सूचना काढल्याने खळबळ उडाली आहे. मुळात गंगापूर रस्ता सरळ असताना व रस्त्याच्या दोन्ही बाजू सरकल्यास आरक्षणे बाधित होत असताना महापालिकेने संरेषा बदलाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. (Public notice from Municipal Corporation to change alignment of Gangapur Road)

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून जाहीर सूचनेद्वारे गंगापूर रोड संरेषा बदलण्यासाठी सूचना जारी केली. गंगापूर शहरातील सर्वे क्रमांक ३२ या जागेतून ३० मीटर रुंद विकास योजना रस्ता प्रस्तावित असून रहिवासी क्षेत्रात समाविष्ट आहे. मौजे गंगापूर गाव शिवारातील सर्वे क्रमांक ३२ या हिश्यातील संरेषा जागेवरील उपलब्ध असलेल्या परिस्थितीनुसार बदलण्याची विनंती काही अर्जदारांनी केली.

परंतु जागेवर दक्षिण बाजूला सर्वे क्रमांक ३१, २२ तसेच ३० गंगापूर शिवारात मंजूर नकाशा आहे. जागेवर प्रत्यक्ष मोजणी केलेला स्थळदर्शक नकाशा प्रमाणे रस्त्याची संरेषा करणे उचित राहील असे मत महापालिकेने मांडले आहे. सध्या अस्तित्वात असलेली संरेषा मंजूर विकास योजनेनुसार असल्याचे मान्य करताना वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

शहराच्या मंजूर विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार सर्वे क्रमांक ३२ मध्ये मंजूर नकाशातील विकास योजनेनुसार तीस मीटर रुंद विकास योजना रस्त्याची सरळ रेषेमध्ये अंशतः बदल करणे आवश्यक असल्याचे मत मांडताना आयुक्तांना तसे अधिकार असल्याचादेखील दावा करण्यात आला आहे. (latest marathi news)

मौजे गंगापूर शिवारातील सर्वे क्रमांक ३२ तसेच आनंदवली शिवारातील सर्वेक क्रमांक ५३ ब या जमिनीवरून जाणाऱ्या प्रस्तावित ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्याच्या रेषा बदलण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. तीस दिवसांच्या आत हरकती नोंदविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. महापालिकेच्या या जाहीर सूचनेला माजी महापौर दशरथ पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. नियोजनाअभावी शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप केला.

जलसंपदाच्या जागेसह नाला बुजविण्याचा संशय

सद्यःस्थितीमध्ये गंगापूर रोड ३० मीटरचा आहे. रस्त्याची संरेषा ही सरळ असताना का बदलली जात आहे, असा प्रश्न निर्माण होतो. संरेषा बदलण्याचे कारण काय, या संदर्भात महापालिकेतून अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. सर्वे क्रमांक २२ मध्ये खेळाचे मैदानासाठी भूखंड आरक्षित जागा आहे. रस्त्याची संरेषा अर्थात अलायमेन्ट हलविल्यास खेळाच्या मैदानाचे आरक्षण बाधित होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आरक्षण हटविण्यासाठी संरेषा नव्याने आखली जात नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्या व्यतिरिक्त संरेषा बदलल्यास या भागातील काही बांधकाम व्यवसायिकांच्या लेआऊटला लाभाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वे क्रमांक ३२ मध्ये दोन्ही जागा एकाच मालकाच्या आहे.

त्याशिवाय येथून चिखली नाला जातो व जलसंपदा विभागाच्या दोन जागा आहेत. त्या जागेवर रस्त्याची अलाइनमेंट फिरवून, नाला बुजविण्याचे तर प्रयत्न नाही ना, असा संशय माजी महापौर पाटील यांनी व्यक्त करताना गंगापूर हा ३० मीटरचा रस्ता सरळ रेषेत असताना संरेषा बदलण्याचे कारण काय या संदर्भात प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा पाटील यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT