Nashik News : शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या जाहीर झाल्यानंतर पर्यटनासह इतर विविध कारणांनी प्रवाशांची संख्या वाढत असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसफेऱ्यांची व्यवस्था केली आहे. एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत या जादा बसफेऱ्या उपलब्ध राहातील. पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सटाणा, नंदुरबारसाठी दर अर्ध्या तासाला बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. (Nashik Planning extra bus trips during summer vacation by msrtc marathi news)
परगावी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी उन्हाळी सुट्यांमध्ये मूळ गावी परतत असतात. याशिवाय माहेरवाशीणींना आपल्या घराची ओढ लागलेली असते. त्यामुळे महिला वर्ग आपल्या चिमुरड्यांसह माहेर गाठत असतात. उन्हाळी सुट्यांचे औचित्य साधताना अनेकांकडून पर्यटनाचाही आनंद घेतला जात असतो.
या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने नियमित बसफेऱ्यांसोबत संभाव्य गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन आखले आहे. या बसफेऱ्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादेखील शासकीय योजनांनुसार तिकीट दरांमध्ये सवलत उपलब्ध असणार आहे. (latest marathi news)
यामध्ये प्रामुख्याने धुळे, जळगाव, नंदुरबारसाठी विविध आगारांतून जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. याशिवाय पुण्यासाठीदेखील प्रवासी संख्या लक्षणीय राहात असल्याने या मार्गावर जादा बस धावतील. छत्रपती संभाजीनगरसाठी जादा बस उपलब्ध राहणार असून, धार्मिक पर्यटनाच्या अनुषंगाने सप्तशृंगी गड, शिर्डी तसेच त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.