During the meeting of Sinner Industrial and Manufacturers Association, MP Rajabhau Vaje and entrepreneurs posing various questions. esakal
नाशिक

Nashik: नाशिक-पुणे द्रुतगती महामार्ग हवाच! सिन्नरच्या उद्योजकांची भूमिका; नाशिक-पुणे कनेक्टीव्हीटी वाढल्यास उद्योग-विकासाला गती शक्य

Latest Nashik News : सिन्नरचा वाढता औद्योगिक विस्तार व त्याला असलेला वाव आणि पुणे- चाकण औद्योगिक वसाहतीसाठी वाढत जाणारी कनेक्टिव्हीटी यामुळे भविष्याचा विचार करून धोरणकर्त्यांनी याबाबत सकारात्मक व्हावे असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : नाशिक-पुणे द्रुतगती महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयास सिन्नर इंडस्ट्रीअल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. याउलट शासनाने नाशिक - पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्ग वेगाने करण्याबाबत सरकारी पातळीवर योग्य निर्णय व्हावेत अशी सिन्नर इंडस्ट्रीअल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची मागणी आहे.

सिन्नरचा वाढता औद्योगिक विस्तार व त्याला असलेला वाव आणि पुणे- चाकण औद्योगिक वसाहतीसाठी वाढत जाणारी कनेक्टिव्हीटी यामुळे भविष्याचा विचार करून धोरणकर्त्यांनी याबाबत सकारात्मक व्हावे असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. (Pune Expressway must Role of Sinnar Entrepreneurs)

उद्योजकांच्या संघटनेने खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना या मार्गाची उफयुक्तता पटवून दिली. औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास सिन्नरचा विकास वेगाने होऊ शकतो असे मत मांडत सरकारने या द्रुतगती मार्गाच्या भूसंपादनाचा रद्द केलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

बैठकीसाठी ‘सीमा’चे सचिव बबन वाजे, कोषाध्यक्ष राहुल नवले, रतन पडवळ, विठ्ठल जपे, अतुल अग्रवाल, अरूण चव्हाणके, विशाल गोजरे, सोमनाथ वाघ, सतीश नेहे, जगदीश थोरे, शशिकांत नवले, मुकेश देशमुख, तानाजी वारुंगसे, नीलेश गावंड, शरद टर्ले, सचिन कंकरेज, शिवाजी निरगुडे, नामदेव रसाळ, शांताराम दारूंटे, आकाश चव्हाण आदींसह उद्योजक, ‘सीमा’चे पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेमुळे पुणे शहराचा मोठा विकास झाला. या शहरांना जोडणारे जुना व द्रुतगती महामार्ग असे दोन महामार्ग आहेत. तर आता नव्याने चौदा पदरी महामार्ग करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र नाशिक-पुणे द्रुतगती महामार्गाची घोषणा करुनही शासन हा प्रकल्प रद्द करण्याच्या मार्गावर आहे.

यामुळे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे उद्योजकांनी खासदार वाजे यांना सांगितले. औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होण्यासाठी हा महामार्ग गरजेचा असल्याचे वाजे यांना सोदाहरण पटवून देण्यात आले. (latest marathi news)

उद्योजकांच्या बैठकीतील चर्चेचे प्रमुख मुद्दे

- सिन्नर या महार्गावरील महत्वाचे औद्योगिक शहर आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हा महामार्ग गरजेचा.

- मुंबई- नागपूर समृध्दी महामार्ग सिन्नर तालुक्यातून जातो. या मार्गाला नाशिक- पुणे महामार्ग जोडला आहे. त्यामुळे पुणे व नगर शहराची कनेक्टीव्हीटी समृध्दी महामार्गाशी अधिक गतीने होईल.

- सुरत- चेन्नई महामार्ग सिन्नर तालुक्यातून जात असून तो समृध्दी महामार्गाला याच तालुक्यात जोडला जाणार आहे. नाशिक- पुणे द्रुतगती महामार्ग झाल्यास हा महामार्गही सुरत-चेन्नई महामार्गाला जोडला जाईल.

- नाशिक, नगर जिल्ह्यातील कृषी उत्पादन पुणे बाजारपेठेत वेगाने पोहोचणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांना पुणे शहरासारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

- सिन्नर हे शासनाच्या धोरणातील मुंबई- पुणे - औरंगाबाद या सुवर्ण त्रिकोणातील मध्यवर्ती औद्योगिक सेंटर आहे. सिन्नरचे सुवर्ण त्रिकोणातील महत्व विचारात घेता दळणवळणासाठी नाशिक- पुणे द्रुतगती महामार्ग होणे गरजेचे आहे.

- नाशिकचे प्रसिध्द काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर तसेच शिर्डी या देवस्थानांना देश, विदेशातून भाविक येतात. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविक व पर्यटकांच्या सुविधेसाठी हा महामार्ग महत्वाचा आहे.

- द्रुतगती महार्गामुळे औद्योगिक वाढ होऊन गुंतवणूक वाढणार आहे, त्यातून हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

"नाशिक- पुणे द्रुतगती औद्योगिक महामार्गाबाबत आपण आग्रही असून हा महामार्ग होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. नाशिक - पुणे शहराची कनेक्टीव्हीटी वेगाने होणे गरजेचे आहे. यासाठी हा महामार्ग झाला पाहिजे अशी जनतेची इच्छा सरकारला आपण पटवून देऊ. त्यासाठी इतर खासदारांचीही प्रसंगी मदत घेऊ."- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT