ashwini vaishnaw esakal
नाशिक

Semi High Speed ​​Railway : पुणे- सेमी हायस्पीडसाठी मार्ग बदलावा लागणार : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गात खोडद (नारायणगाव) येथील दुर्बीणीचा अडसर असल्याने प्रस्तावित मार्ग बदलावा लागणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. (nashik Pune route will have to be changed for Semi High Speed Railway)

रेल्वेमंत्री वैष्णव नाशिक दौऱ्यावर आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खोडद येथील दुर्बीण ही २३ देशांची मिळून असल्याने तेथून मार्ग नेण्यात अडचणी आहेत. पुण्यात चार टर्मिनलचे काम सुरू असल्याने दीड वर्षानंतर पुण्यातील क्षमता दुप्पट होईल.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच भागांतून पुण्यासाठी मार्गांची आणि गाड्यांची मागणी आहे. पण, तूर्तास तरी इतर भागांतून तेथे रेल्वे सोडण्यात अडचणी आहेत. त्यामुळे नाशिक- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस पूर्ववत सुरू होण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शविली.

राज्यात १३२ स्थानके

महाराष्ट्राला २०१४ पर्यंत जेमतेम एक हजार २०० कोटी रुपयांचा निधी मिळायचा. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत १५ हजार ४९० कोटी निधी दिला. महाराष्ट्रात नागपूर, उजनी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, लासलगाव, नांदगाव, हडपसर, सावदा, पंढरपूर, हातकणंगले, सातारा, कोपरगाव यासह १३२ स्थानकांचे काम सुरू आहे.

स्थानक विकास सहा हजार कोटी, उड्डाणपूल पाच हजार ५०० कोटी, बुलेट ट्रेन ३३ हजार कोटी, कोरिडॉर १२ हजार ५०० कोटी, जळगाव-जालना मार्ग सात हजार कोट, इंदूर- मनमाड- मुंबई मार्ग १८ हजार कोटी अशी एक लाख ६४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात सरकार आल्यापासून झाली आहे. दहा वर्षांत श्रीलंकेच्या मार्गांपेक्षा अधिक एक हजार ८३० किलोमीटर रेल्वेमार्ग एकट्या महाराष्ट्रात झाले.

नमो रॅपिड ट्रेन

पहिल्या दोन कारकीर्दीत आम्ही अनेक प्रयोग केले. या पंचवार्षिकमध्ये त्याचे परिणाम दिसतील, असा दावा करीत ते म्हणाले, की देशात १०० ते २०० किलोमीटर अंतरासाठी नमो रॅपिड ट्रेनचा विचार आहे. पहिली ट्रेन दिल्ली-मेरठ अशी सुरू झाली. महाराष्ट्रातही अशा इंटर सिटी नमो रॅपिड ट्रेन दिसतील. (latest marathi news)

नाशिक ते वाढवण बंदर

रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी काही प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यात मध्य रेल्वे पश्चिम आणि दक्षिण रेल्वेशी जोडण्याचे काही विषय विचाराधीन आहेत. त्यात नाशिक- डहाणू आणि नाशिक- शिर्डी- जळगाव- उधना यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होत आहेत.

नाशिक- शिर्डी मार्गामुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र थेट दक्षिण भारताशी जोडला जाईल; तर नाशिक- डहाणू मार्गामुळे पश्चिम रेल्वेबरोबर जगातील १० व्या क्रमांकाच्या वाढवण बंदराशी नाशिकची कनेक्टिव्हिटी सुरू होईल. कृषी माल वाहतुकीसाठी स्टोअरेज आणि विशेष बोग्यांचे नियोजन आहे.

चारशे रुपयांत हजार किलोमीटर

देशातील गरीब, सामान्यांना ४०० रुपयांत हजार किलोमीटर प्रवास करता यावा, या उद्देशाने एक हजार २५० जनरल बोग्यांचे काम सुरू आहे. असे असताना रेल्वेच्या खासगीकरणाच्या अफवा पसरविल्या जात आहेत. देशात रेल्वे, लष्कर यात राजकारण होऊ नये, असे माझे विरोधकांनाही आवाहन आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३? सोशल मीडियावर ट्वीट व्हायरल

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Latest Maharashtra News Updates: पियुष गोयल यांच्या हस्ते मालाडमधील मनपा शाळेचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT