Politicians Banner esakal
नाशिक

Nashik Vidhan Sabha Election Banners : विनापरवानगी नेत्यांचे बॅनर लावणे भोवणार! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी

Latest Nashik News : जागामालकाच्या परवानगीशिवाय नेत्यांचे बॅनर लावता येणार नाही, तसेच मालकास धमकावल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vidhan Sabha Election Banners : विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सूचना जारी केल्या आहेत. जागामालकाच्या परवानगीशिवाय नेत्यांचे बॅनर लावता येणार नाही, तसेच मालकास धमकावल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. (Putting up banners of leaders without permission illegal)

पुढील आठवड्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता अंमलबजावणी करताना शासकीय परिसर, मालमत्तेचे विद्रूपीकरण, सार्वजनिक मालमत्ता, परिसराचा गैरवापर, खासगी मालमत्तेचे विद्रूपीकरण या संदर्भात सूचना केल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना

- शासकीय इमारतीची भिंत रंगविणे, लेखन करणे, पोस्टर, बॅनर चिकटविणे, झेंडे लावणे, कटआउट व होर्डिंग उभारण्यास बंदी

- राजकीय जाहिरात सार्वजनिक उपक्रमांच्या मालकीच्या इमारतीवर व जागेत प्रदर्शित करता येणार नाही

- खासगी जागा आणि घरांवर झेंडे लावताना, बॅनर व पोस्टर लावताना संबंधित जागामालकाची परवानगी घ्यावी

- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जागामालकाची संमती असल्याची प्रत द्यावी- राजकीय जाहिरात, झेंडे, बॅनर, पोस्टर लावताना जागामालकाला धाक-दडपशाही करता कामा नये

- खासगी वाहनावर झेंडे, स्टीकर लावून उमेदवारांचा प्रचार करता येणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Jowar-Beet Crackers :थंडीत चविष्ट आणि हेल्दी स्नॅक खावंसं वाटतं? घरच्याघरी बनवा ज्वारी-बिटचे क्रॅकर्स!

Vikas Thackeray : त्सुनामीच्या लाटेत पश्चिमने तारला ‘पंजा’...जनतेची मिळाली ‘विकास’ला साथ

SCROLL FOR NEXT