Garbage kept in student sleeping area esakal
नाशिक

Nashik Ashram Shala Problems : आदिवासींसाठी दर्जेदार शिक्षण कागदावरच! वैतरणा आश्रमशाळेत शिक्षण अन्‌ निवास एकाच खोलीत

Latest Nashik News : गेल्या दहा वर्षांपासून शाळा इमारतीच्या बांधकामासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने एकाच इमारतीत मुलांना शिक्षण व निवास करावा लागत आहे. आश्रमशाळेत शौचालय, बेसिन, झोपण्याच्या जागेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : वैतरणानगर (ता. इगतपुरी) येथील आदिवासी विकास विभागाची शासकीय निवासी आश्रमशाळा असून, या ठिकाणी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळी जागा आवश्यक असताना येथे शिक्षण व निवास एकाच खोलीत असल्याचे चित्र आहे.

कोंडवाड्यासारख्या परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे भगवान मधे यांनी दिला आहे. (Vaitrana Ashram School education accommodation in one room)

गेल्या दहा वर्षांपासून शाळा इमारतीच्या बांधकामासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने एकाच इमारतीत मुलांना शिक्षण व निवास करावा लागत आहे. आश्रमशाळेत शौचालय, बेसिन, झोपण्याच्या जागेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्व दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

येथील नियुक्त शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, ते सर्व शिक्षक नाशिकहून ये-जा करतात. त्यामुळे शाळेकडे व विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला. या सर्व समस्या एल्गार कष्टकरी संघटनेने आदिवासी विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. (latest marathi news)

"केवळ उद्‌घाटन करून विकासाचे स्वप्न दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून त्याचे फलित काय, हे वैतरणा आश्रमशाळेवरून स्पष्ट होते. आदिवासी विद्यार्थ्यांना येथे शिक्षण की शिक्षा, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे."- भगवान मधे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT