Radhakrishna Vikhe Patil : माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपने २८८ जागा लढवाव्यात असे सूतोवाच केल्यानंतर नाशिकमधूनदेखील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला. या वेळी पक्षाचे प्रभारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करताना विरोधक अप्रचार करत असताना तुम्ही काय अनुदानाची वाट पाहत होतात का, असा सवाल केला. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतदेखील विरोधाच्या विरोधात नरेटीव सेट करण्याच्या सूचना दिल्या. (Radhakrishna Vikhe Patil while listening to office bearers opposition propaganda )
भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्या तयारीचा एक भाग म्हणून पक्षाचे जिल्हा संघटनात्मक प्रभारी व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पंचवटीतील एका लॉन्समध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माजी मंत्री डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, दिलीप बोरसे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सुनील बच्छाव, शंकर वाघ, मालेगाव जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, ज्येष्ठ नेते विजय साने आदी उपस्थित होते.
या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विखे-पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी हतबल दिसले. मात्र, पक्षाच्या मेळाव्यामध्ये टाळ्या वाजवायला व पुष्पगुच्छ देण्यात अगदी पुढे दिसले. सभेला उपस्थित राहणे म्हणजे पक्षाचे काम करणे नव्हे. गावात व प्रभागात महायुतीला किती मतदान झाले याची माहिती काढली तर वस्तुस्थिती समोर येईल. लोकसभेत विरोधात अपप्रचार करत असताना पदाधिकारी अनुदानाची वाट पाहत होते का, असा सवालदेखील त्यांनी केला. (latest marathi news)
पराभवावर मंथन करून विजय मिळणार नाही. विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोचवण्यात आपण अपयशी ठरलो भाजप व काँग्रेसच्या कार्यकाळातील तुलनात्मक कामे लोकांसमोर पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मानता आली नाही. प्रभागात, गावांमध्ये जनजागृती करता आली असती मात्र तसे काम झाले नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर आपल्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद करतील. त्यामुळे आपसांतील वाद बाजूला ठेवून विरोधकांना जशास तसे उत्तर द्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेमध्ये आता परिवर्तन हवे असल्याचे त्यांनी सांगताना काम करणाऱ्याला पदे देण्याचे तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विधानसभा निवडणूक लढविण्याचे आवाहन केले.
पदाधिकारी म्हणतात स्वबळावर
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा घेण्यात आला. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील पराभवाची कारणे स्पष्ट केली. त्याचबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची मागणीदेखील केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.