Congress leader Rahul Gandhi speaking at a meeting held on the occasion of Bharat Jodo Nyaya Yatra on Thursday. Sharad Pawar, the leader of NCP (Sharad Pawar group) on the platform esakal
नाशिक

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: बड्यांना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: केंद्र सरकारने बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये कर्ज माफ केले, मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही, असा प्रश्न करीत या उद्योगपतींना दिलेल्या कर्जमाफीच्या रकमेत देशातील शेतकऱ्यांना २४ वेळा कर्जमाफी देता आली असती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: केंद्र सरकारने बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये कर्ज माफ केले, मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही, असा प्रश्न करीत या उद्योगपतींना दिलेल्या कर्जमाफीच्या रकमेत देशातील शेतकऱ्यांना २४ वेळा कर्जमाफी देता आली असती. या रकमेतून देशातील ‘मनरेगा’चे २४ वर्षे काम चालले असते. (Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi Question to Central Govt marathi news)

इतक्या मोठ्या रकमेची कर्जमाफी काही मोजक्या उद्योगपतींसाठी केंद्र सरकारने दिली, असा घणाघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथील शेतकरी संवाद यात्रेत केला. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते जयराम रमेश, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, हेमंत टकले, विश्‍वजित कदम, यशोमती ठाकूर, डॉ. हेमलता पाटील, डॉ. शोभा बच्छाव, बाजार समितीचे सभापती संजय जाधव, सुधाकर बडगुजर, जयंत दिंडे, उत्तम भालेराव, डॉ. सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर, शिवाजी कासव, समाधान जामदार, अन्वर पठाण, दीपांशू जाधव उपस्थित होते.

स्वामीनाथन आयोग लावू

राहुल गांधी म्हणाले, की शेतकऱ्यांना आजच्या घडीला सर्वच बाजूंनी घेरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. शेतकरी प्रचंड दुःखी आहे. या दुःखावर आमचे सरकार आले तर रामबाण इलाज केला जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी योग्य व्यवस्था उभी करावी लागेल. स्वामीनाथन आयोग लागू केला जाईल. ()

पीकविमा हा शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आहे. मात्र, शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. त्यासाठी पीकविमा योजनेची पुनर्रचना केली जाईल. कांद्याला भाव मिळत असताना अचानक निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. त्यासाठी कांदा व शेतमाल आयात-निर्यात धोरण निश्‍चित करून कांदा व द्राक्ष उत्पादकांना न्याय दिला जाईल.

शेतकऱ्यांना लावलेला जीएसटी रद्द करण्यात येईल. आम्ही शेतकऱ्यांचे दुःख समजणारे व शेतकऱ्यांचा सन्मान करणारे आहोत. शेतकऱ्यांसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले असतील, असा विश्‍वासही राहुल यांनी शेतकऱ्यांना दिला.

कांद्याला रास्त भाव द्यावा

शरद पवार म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेहनत करणारा आहे. मात्र, सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली. शेती अन् शेतकऱ्यांबद्दल या सरकारला आस्था नाही. मी कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले, तेव्हा भाजपचे नेते संसदेत कांद्याच्या माळा घालून भाव कमी करण्यासाठी आंदोलन करीत होते. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मला माहीत असल्याचे सांगून कांद्याला रास्त भाव द्यायला हवा, असे ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी देशात परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ( latest marathi news )

गद्दारांना कोटी, शेतकऱ्याला छदाम

संजय राऊत म्हणाले, की चांदवड कांदानगरी आहे. पण, कांद्याने इथल्या शेतकऱ्यांना रडविले आहे. गद्दार आमदार, खासदारांना ५० कोटी देतात. पण, कांद्याला भाव देत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केंद्र सरकारमुळे शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. खतांचे दर वाढले अन् कांद्याचे दर कमी झाले. त्यातून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांचे रक्षण व्हावे

सीमेवर तैनात सैनिकांना अग्निवीर करून कमकुवत केले आहे. सैनिक देशाच्या सीमेवर संरक्षण करतात; तर शेतकरी देशात जनतेचे रक्षण करतात. शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांचे रक्षण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT