Raosaheb Danve, Hemant Godse, Alok Sharma and Railway officials while inaugurating the wheel factory here. esakal
नाशिक

Raosaheb Danve : रेल्वेचे जाळे विस्तारणासाठी व्हील वर्कशॉप लाभदायी : रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे

Nashik News : एकलहरे येथील रेल्वे व्हील वर्कशॉपमुळे रेल्वेच्या नवीन चाकांच्या असेंबलीसाठी आणि चालवलेल्या चाकांच्या संचाच्या दुरुस्तीसाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : एकलहरे येथील रेल्वे व्हील वर्कशॉपमुळे रेल्वेच्या नवीन चाकांच्या असेंबलीसाठी आणि चालवलेल्या चाकांच्या संचाच्या दुरुस्तीसाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे. व्हील वर्कशॉपची चाकांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी या विभागात खूप गरज होती.

चाकांच्या उपलब्धतेमुळे वेळेची बचतदेखील होणार आहे व रेल्वे प्रवाशांना आणखी सुखकर प्रवासाचा अनुभव देखील मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात रेल्वेचे जाळे झपाट्याने विस्तारत असल्याने व्हील वर्कशॉप हे अत्यंत उपयोगी ठरणार आहे, असे प्रतिपादन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. (nashik Railway Minister Raosaheb Danve marathi news)

एकलहरे येथील मध्य रेल्वेच्या कर्षण मशिन कारखान्यातील रेल्वे चाकांची निर्मिती कारखान्याचे (व्हील शॉप) सोमवारी (ता. २६) उद्‌घाटन केल्यानंतर मंत्री दानवे बोलत होते. या वेळी खासदार हेमंत गोडसे, मुख्य कारखाना व्यवस्थापक अलोक शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जानेवारी २०१५ मध्ये खासदार हेमंत गोडसे, कामगार युनियनचे भारत पाटील, आनंद गांगुर्डे, पुंजाराम जाधव, पी. ए. पाटील, किरण खैरनार आदींच्या शिष्टमंडळाने दिल्लीत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. कर्षण कारखान्याचा विस्तार करून चाकांचा कारखाना सुरू करण्याची मागणी केली होती.

त्याला यश आले. तत्कालीन अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते २०१९ मध्ये चाकांच्या कारखान्याचे भूमिपूजन झाले होते. आता पाच वर्षांनंतर कारखाना उभा राहिल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एकलहरे येथे रेल्वे प्रकल्पांसाठी २५० एकर जागा उपलब्ध करून दिली होती. (Latest Marathi News)

१६ फेब्रुवारी १९८१ मध्ये २५ एकरमध्ये कर्षण कारखाना सुरू झाला. त्यामध्ये रेल्वेच्या मोटारींचे उत्पादन व दुरुस्ती केली जाते. कर्षण कारखाना आवारातच १७ एकरमध्ये चाकांचा नवीन कारखाना उभा राहिला आहे.

नाशिक रोडला रेल्वेस्थानक, रेल्वे मालधक्का आहे. तसेच एकलहरे येथे रेल्वे सुरक्षा बलाचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र आणि देशातील रेल्वे अभियंत्यांना प्रशिक्षण देणारी इरीन ही प्रगत संस्था आहे. या सर्व उपक्रमांतून परिसरातील हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे.

कर्षण कारखान्याची अजूनही ७० एकर जमीन पडिक आहे. तेथे रेल्वे इंजिनची बोगी (चेसी) तयार करणारा कंपलीट मोटराइज्ड बोगी प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. भारत पाटील, सुभाष सोनवणे, संदीप नगरे, किरण खैरनार, सचिन धोंगडे, सी. डी. बोरसे, अक्षय गायकवाड, ओंकार भोर, ज्ञानेश्वर निसाळ, सचिन चौधरी, जय आतीलकर, मंगेश सायखडे, लहू खलाने यांनी रोजगारनिर्मिती आणि नाशिकच्या उद्योग क्षेत्रात चाकांच्या कारखान्याची भर पडल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT