Even today, people have to bring water for drinking on bullock carts from village to village esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: 93 दिवसांत अवघे 10 दिवस पाऊस! आतापर्यंत केवळ 45 टक्केच पाऊस

संतोष विंचू

Nashik Rain Crisis : राज्यातील ९४ दुष्काळी तालुक्यातील एक आणि ब्रिटिशकालीन दुष्काळी शिक्का लागलेल्या येवला तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या ९३ दिवसांत केवळ दहा दिवसच पाऊस झाला.

यामुळे संपूर्ण वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४५ टक्केच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण अवघे २४६ मिलिमीटर आहे.

मागील चार दिवसांत जिल्हाभर धो-धो पाऊस होत असताना, येथे शुक्रवारी (ता. ८) अवघे दोन तास पाऊस झाला. पुन्हा उघडीप दिल्याने चिंता वाढली आहे. (Nashik Rain Crisis Only 10 days of rain in 93 days So far only 45 percent rain nashik)

नेहमीच खरिपाच्या पेरणीसाठी प्रतीक्षा करायला लावणारा वरूणराजा यंदा सलामीलापासून रुसला आहे. रोज दाटलेल्या ढगामुळे आज चांगली हजेरी लागणार, हे बांधले गेलेले अंदाज अन्‌ प्रत्यक्षात पावसाची भेटणारी हुलकावणी, असे चित्र गेले तीन महिने पाहून थकलेला बळीराजाची चिंता वाढली आहे.

जूनमधील सलामीच्या २० दिवसांत केवळ १ मिलिमीटर पाऊस पडल्याने पेरणीला जुलै उजडला. रिमझिमेवर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली असली.

तरी ७० टक्के क्षेत्रावर नुकसान झाले आहे. सुरवातीला रिमझिमवर पिके जोमात होती. आता पूर्णतः करपलेली पिके शेतात दिसत आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप वाया गेल्या असून, दुष्काळाचे दाट ढग जमले आहेत.

तालुक्याची पर्ज्यन्याची वार्षिक सरासरी केवळ ५४४ मिलिमीटर आहे. ब्रिटिशांच्या यादीत दुष्काळी असलेल्या या तालुकाची साडेसाती अजून संपलेली नसून वार्षिक सरासरी अल्प मिलिमीटर असली, तरी ती गाठताना नाकीनऊ येते.

यंदाही समाधानकारक पाऊस पडला नसून ७ जूनपासून आजपर्यंत तब्बल ९३ दिवस झाले. या काळात अवघ्या दहा दिवसच चांगल्या पावसाने हजेरी लावली. यातही पावसाचे प्रमाण दहा-१५ मिलिमीटरदरम्यान राहिले.

इतर १०-१२ दिवशी रिमझिमीवर दोन-पाच मिलिमीयर पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी प्रथमच मुसळधार पाऊस या वर्षी पाहायला मिळाला. पावसाअभावी भूजल पातळीत वाढ न झाल्याने अद्याप विहिरींना पाणी आलेले नाही.

नदी, नाले, बंधारे कोरडेठाक आहेत. पालखेड कालव्याच्या ओव्हर फ्लोच्या पाण्याचा लाभ होऊन नदी-नाले भारतात. यंदाही ते पाणीही मिळणे कठीण झाल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. किंबहुना ५० गावे वाड्यांची टँकरवर तहान भागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धो धो नव्हे, तर सो सो पाऊस

जून ते सप्टेंबरचे तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४५३, तर वार्षिक सरासरी ५४४ मिलिमीटर आहे. जून महिन्यात पहिला पाऊस २५ जूनला चाळीस मिलिमीटरच्या आसपास पडला. त्यानंतर जुलैत एक दोन दिवस वगळता इतर दिवशी केवळ रिमझिमवर समाधान मानावे लागले.

ऑगस्ट पूर्णतः कोरडा गेल्याने शेतातील उभी पिके आता करपली आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत केवळ १८० मिलिमीटर पाऊस पडला, तर सप्टेंबरने मात्र थोडा दिलासा दिला.

मागील दहा दिवसांत ६५ मिलिमीटर पाऊस झाला. अर्थात आता पाऊस पडला. पिके मात्र करपल्याने खरिपाचे ७५ टक्क्यांवर नुकसान ठरले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

पावसाचे आकडे बोलतात...

-आजपर्यंत पाऊस : २४५ मिलिमीटर

-आतापर्यंत पावसाची सरासरी : ४५ टक्के

-जुलैचे सरासरी पर्जन्यमान : ११४ मिलिमीटर

-जुलैत पडलेला पाऊस : ८६ मिलिमीटर

-जून ते ऑगस्टचे सरासरी पर्जन्यमान : ३२२ मिलिमीटर

-जून ते ऑगस्टचे सरासरी पर्जन्यमान : १८० मिलिमीटर

मंडलनिहाय आजपर्यंतचा पाऊस

मंडल- पाऊस (मिलिमीटरमध्ये)

येवला-२०४

अंदरसूल-२९०

नगरसूल-२५६

पाटोदा-२८२

सावरगाव-२७६

जळगाव नेऊर-१८५

अंगणगाव-७५

राजापूर-४८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT