Rain Crisis esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: दुष्काळाच्या जखमा ठेवून संपला पावसाळा! फक्त दिंडोरीत सरासरीची शंभरी; जिल्ह्यात अवघा 63 टक्के पाऊस

संतोष विंचू

येवला : नाशिक जिल्ह्यात यंदा वरूणराजाने शेवटपर्यंत पाणी-पाणी करण्याची वेळ आणली. अनेक तालुक्यात पाणजंजाळ करून संपणारा पावसाळा यंदा जिल्ह्याला कोरडा ठेवूनच संपला.

सात ते आठ तालुक्यांत दुष्काळाच्या जखमा ठेवूनच पावसाने यंदा अलविदा केल्याने येणाऱ्या आठ ते दहा महिन्यांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. (Nashik Rain Crisis rainy season ended with scars of drought 100th of average in Dindori only Only 63 percent rainfall in district)

सुरवातीपासूनच पावसाने दगाबाजी केल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या. पेरणी पावसाच्या सरीवर तग धरून असताना, धोंड्याचा महिना पूर्ण कोरडा गेला आणि शेतातील उभी पिके करपायला सुरवात झाली.

तेथूनच दुष्काळाची चाहूल लागली होती. गणपती बाप्पा पावतील आणि नवरात्रात देवीची कृपा होईल, हा शेतकऱ्यांचा भाबडा आशावादही रुसलेल्या वरुणराजाने स्वप्नवतच ठेवल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून, दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जूनची जिल्ह्याची वार्षिक सरासरी १७४ मिलिमीटर असताना, फक्त ९२ मिलिमीटर पाऊस झाला. जुलैतही पावसाने रुसवा कायम ठेवत शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहायला लावले.

जुलैची सरासरी ३०८ मिलिमीटर असताना, केवळ २३० मिलिमीटर पाऊस झाल्याने पेरण्यांना चालना मिळाली. या दोन्ही महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत केवळ ६७ टक्केच पाऊस झाला. ऑगस्टनंतर सगळ्यात मोठा धोका दिला.

२६६ मिलिमीटरची सरासरी असताना, केवळ ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मात्र त्याने चित्र बदलले नाही. या महिन्यात सरासरी पाऊस झाल्याचे समाधान या महिन्याने दिले.

ऑक्टोबर पावलाच नाही. त्यामुळे जून ते ऑक्टोबरदरम्यान ९४५ मिलिमीटर सरासरी असताना, अवघा ६४५ मिलिमीटर पाऊस झाला. चारही महिने वरुणराजा दडी मारून बसल्याने जिल्ह्याचे नुकसानीचे आकडे मोठे होऊन शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला.

माहेरघरीच पाणीबाणी

जिल्हा भौगोलिकदृष्ट्या तीन ते चार भागांत आणि पर्जन्याच्या दृष्टीने दोन भागांत विभागला आहे. दरवर्षी पर्जन्याच्या माहेरघर असलेल्या पश्चिम पट्ट्यात धो धो पाऊस पडतो, तर अवर्षणप्रवण पूर्वेकडील तालुके ‘पाऊस पडू दे गा देवा’, असे म्हणतात.

यंदा उलटी स्थिती असून, दुष्काळी तालुक्यांसह पावसाचे माहेरघर असूलेलेच राहिले. पावसाळा संपल्यानंतर जून ते डिसेंबरदरम्यान जिल्ह्याची वार्षिक सरासरी १०२३ मिलिमीटर असताना, ६५१ मिलिमीटर पाऊस पडून अवघा ६३ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली.

पेठ व सुरगाणा तालुक्याात वार्षिक सरासरीच्या केवळ ७१ टक्के, त्र्यंबकेश्वरमध्ये ७२, तर इगतपुरीत अवघा ५२ टक्के पाऊस झाला. १५ पैकी एकमेव दिंडोरी तालुक्यानेच सरासरीची शंभरी गाठली असून, येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

याउलट दुष्काळी मालेगावमध्ये फक्त ६३, सटाण्यात ६७, येवल्यात ७८, देवळ्यात ६१, सिन्नरमध्ये ५९ व नांदगावमध्ये ५५ टक्के, चांदवडमध्ये ६४, नाशिक ६८ टक्के पाऊस झाला. दुष्काळी तालुक्यासह माहेरघरीही दुष्काळाची तीव्रता अधिक आहे हे आकडेवारी सांगते.

कमीच पाऊस... तरीही दुष्काळ का नाही

सद्यस्थितीत शासनाने मालेगाव, येवला व सिन्नर तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या खालोखाल नांदगाव, इगतपुरी, चांदवड, देवळा, बागलाण या तालुक्यांची आकडेवारी व परिस्थिती गंभीर आहे. असे असतानाही शासनाने येथे दुष्काळ का जाहीर केला नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

मुळात या तालुक्यांतील धरणात पाणी आहे किंवा एखाद्या दोन मंडलात जास्त पाऊस आहे, म्हणून तालुका दुष्काळ जाहीर न करणे हा अन्याय असल्याने मंडलांमध्ये पावसाच्या प्रमाणानुसार दुष्काळ जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागील वर्षापेक्षा निम्माच पाऊस

२०२२ मध्ये जिल्ह्यात इगतपुरी तालुका वगळता सर्व १४ तालुक्यांनी सरासरीची शंभरी गाठली होती.

दिंडोरीत २४४, चांदवडमध्ये २११, निफाडमध्ये १७७, असा दीडशे मिलिमीटरपेक्षा जादा पाऊस सर्व दूर झाला अन्‌ सरासरी १३६ टक्के पाऊस नोंदला गेला.या वर्षी चित्र उलटे असून, अवघा ६३ टक्केच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता सहजपणे लक्षात येते.

१०० मंडले तहानलेले!

जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात फक्त ११ महसूल मंडळांनी सरासरीचे शतक गाठले आहे. कळवाडी, मुल्हेर, दळवट, अभोणा, उमराळे, ननाशी, कोशिंबे, कसबे वणी, पांढुर्ली, नायगाव आणि अंदरसूल या मंडलातच या वर्षी सरासरीची शंभरी ओलांडली आहे.

याव्यतिरिक्त १०० मंडलांत ५० ते ८० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे. १५ मंडलात ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याने आताच तेथे पाणीबाणीची स्थिती आहे. आता मंडले दुष्काळी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

या वर्षी तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) (आकडेवारी आजपर्यंतची...)

तालुका- वार्षिक पर्जन्यमान- झालेला पाऊस- टक्के

नाशिक - ७८१ - ५३७ - ६८

इगतपुरी - ३१६८ - १६७५ - ५२

दिंडोरी - ७६२ - ८२० - १०७

पेठ - २१२४ - १५१२ - ७१

त्रंबकेश्वर - २२४४ - १६२४ - ७२

मालेगाव - ५३८ - ३३९ - ६३

नांदगाव - ५८३ - ३२१ - ५५

चांदवड - ६०९ - ३९४ - ६४

कळवण - ७३६ - ६३५ - ८६

बागलाण - ५६६ - ३८० - ६७

सुरगाणा - १९९२ - १५०६ - ७५

देवळा - ५०९ - ३०६ - ६०

निफाड - ५४६ - ३६० - ६५

सिन्नर - ६३० - ३७२ - ५९

येवला - ५४४ - ४२५ - ७८

जिल्हा सरासरी - १०२३ - ६५१ - ६३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT