rain Update esakal
नाशिक

Nashik Rain Update : येवल्यातील ढगफुटीमध्ये 103 अन् वावी- शहामध्ये 98.5 mm पाऊस!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पावसाळ्यासारखा परतीच्या पावसाने कृषी क्षेत्रासह शहरी भागाची दाणादाण उडविण्याचे सत्र कायम ठेवले आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये येवल्यात १०३, तर वावी-शहामध्ये प्रत्येकी ९८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कळवण, कनाशी, दळवट, अभोणामध्ये प्रत्येकी ६९, उंबरठाण व सुरगाणामध्ये प्रत्येकी ६७.८, उमराळे आणि कोहोरमध्ये प्रत्येकी ८०.५, सायखेड्यात ६६.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. (Nashik Rain Update 103 mm rain in cloudburst in Yeola 98 mm rain at Vavi Shah Nashik News)

परतीच्या पावसाने जिल्ह्यात ओल्या दुष्काळसदृश परिस्थिती तयार झाली आहे. येवलाकरांनी ढगफुटी अनुभवली. येवल्यातील बाजारपेठेत तळे साचले आणि दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले. नाले गायब झाले आहेत. सिन्नरमध्ये सोयाबीन, मका, बाजरी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मूग, उडीद, कुळीदचे नुकसान झाले आहे. देवळा तालुक्यात पिकांची वाताहत झाली आहे. कांद्याची रोप जगवण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. शेतात पाणी साचल्याने लाल कांदा खराब झाला आहे. द्राक्षे, डाळिंब, कोबी, मका, सोयाबीन आपत्तीग्रस्त झाले आहे. वाखारी, भिलवाड, कापशी, मकरंदवाडी, भावडेमध्ये कांदा, मका पिकांची वाताहात झाली आहे.

जळगाव नेऊर भागात सोंगणीचे सोयाबीन शेतात पडून असून सोयाबीन काळे झाले आहे, तर काही सोयाबीनला कोंब फुटू लागले आहे. मका आडवी झाली आहे. चिचोंडी भागात मका, सोयाबीन, कांदा रोपे पाण्यात आहेत. उमराळे भागात टोमॅटो, कोबी, वांग्यावर पाणी फिरले आहे. याशिवाय आदिवासी भागातील भाताच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाभरातील या साऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांमधून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

२४ तासातील पाऊस

जिल्ह्यातील काही मंडळामध्ये आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सौंदाणे-२४.३, सटाणा-२१.३, ब्राह्मणगाव-२०.५, वीरगाव-१४.५, डांगसौंदाणे-२८.३, नवीबेज-३०, मोकभणगी-३०, वेहेळगाव-३५, बाऱ्हे-२४.५, मनखेड-१७.३, नाशिक-३८, सातपूर-२४.३, गिरणारे-४२.५, शिंदे-२८.५, माडसांगवी-१३, मखमलाबाद-१८.८, पाथर्डी-२४.३, दिंडोरी-५१, मोहाडी-४०, ननाशी-२४, कसबेवणी-१८.८, वरखेडा-५१, इगतपुरी-४४.५, घोटी-२७.५, वाडीवऱ्हे-५१.३, नांदगावसदो-३६, टाकेद-२७.८, धारगाव-१३.५, पेठ-२३.३, जोगमोडी-१३, निफाड-१८.८, पिंपळगाव बसवंत-२३.८, चांदोरी-३६.८, देवगाव-२४.३, ओझर-१३.८, पांढुर्ली-१३.५, नांदूरमधमेश्‍वर-३७, नगरसूल-१५, अंदरसूल-१५, पाटोदा-१६.५, सावरगाव-३१.३, जळगाव-१३.५, चांदवड-२२.३, रायपूर-५१.८, दिघवद-२२.३, दुगाव-६७, वडनेर-२३.८, वेळुंजे-१४.५, हरसूल-३१.५, देवळा-३४.३, लोहणेर-२०.३, उमराणे-१८.३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT