As the water storage in Gangapur dam reached 68 percent on Friday morning, five hundred cusecs of water was released into the Godavari reservoir for the first time this year through gate number five of the dam. esakal
नाशिक

Nashik Rain Update: पावसाळ्यातला पहिला विसर्ग...! ‘दारणा’पाठोपाठ गंगापूर धरणातून विसर्ग

शुक्रवारी गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीतील पाणवेली आणि घाण वाहून जाण्यास मदत होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : शहर व जिल्ह्यात अपेक्षित पाऊस नसला, तरी पश्‍चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाऊस सुरू असल्याने धरणातील पातळी वाढत आहे.

दारणा धरणापाठोपाठ शुक्रवारी (ता. २८) गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी गंगापूर धरणातून ५५० क्यूसेसचा विसर्ग सुरू झाला. (Nashik Rain Update Discharge from Gangapur Dam after Darna nashik news)

शहर- जिल्ह्यात यंदा अजूनही अपेक्षित पाऊस नाही. मात्र, पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यात आणि प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने दोन दिवसांपूर्वी दारणा धरण ७० टक्के भरल्याने त्यातून विसर्ग सुरू झाला.

शुक्रवारी गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीतील पाणवेली आणि घाण वाहून जाण्यास मदत होणार आहे.

पश्‍चिम पट्ट्यात पाऊस

हवामान विभागाने तीन दिवसांपासून सह्याद्री घाटमाथ्याच्या पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन्ही बाजूंना पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार तीन दिवसांपासून शहर-जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यातील घाटमाथ्यालगतच्या तालुक्यात पावसाचा जोर आहे.

इगतपुरी तालुक्यात दारणा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने सोमवारी (ता. २४) दुपारपासून दारणा धरणातून विसर्ग सुरू आहे. दारणा धरण ७५ टक्क्यांहून अधिक भरल्यावर त्यातून विसर्ग सुरू होता.

सध्या दारणा धरणात ७८ टक्के साठा आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशी दारणा धरणातून सकाळी आठला आठ हजार ३१२ क्यूसेस, नऊला १० हजार ५१४, तर दुपारी बाराला ११ हजार ५५२ क्यूसेस विसर्ग वाढविण्यात आला.

तब्बल आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे खऱ्या अर्थाने पश्‍चिम पट्ट्यातील पावसाळी तालुक्यात पावसाळ्याचे वातावरण दिसायला लागले आहे. नदी, नाले, धबधबे वाहू लागले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘गंगापूर’मधून विसर्ग

त्र्यंबकेश्‍वरला गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. आंबोलीसह पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरण ६५ टक्के भरल्यावर त्यातून विसर्ग सुरू होतो. शुक्रवारी धरण ६८ टक्के भरल्याने दुपारी बाराला धरणातून ५३९ क्यूसेसने विसर्ग सुरू करण्यात आला.

गंगापूर समूहात मात्र अजूनही अपेक्षित साठा नाही. समूहात जेमतेम ५४ टक्के इतकाच साठा आहे. दरम्यान, दुपारनंतर गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीपात्र प्रवाही झाले.

पश्‍चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग वाढल्यास पाणवेलीसह घाण वाहून जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या डोळ्यांसह विविध साथरोगांवर नियंत्रण येण्याची नागरिकांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT