Heavy rain file photo esakal
नाशिक

Nashik Rain Update: मालेगावात दमदार पावसाची हजेरी! रब्बीच्या आशा पल्लवित

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : शहर व तालुक्यात आज दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सायंकाळी पाचनंतर झालेल्या जोरदार पावसाने शहरातील झोपडपट्टीसह सखल भागात पाणी साचले.

पावसाच्या पाण्याने गटारी तुडूंब भरून वाहत होत्या. दरम्यान ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात झालेल्या या पावसाने दुष्काळी परिस्थिती दूर होण्यास मदत होणार आहे. पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्‍न सुटू शकेल. पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

शहरासह कसमादेत गेल्या आठवड्यापासून पाऊस रोज हजेरी लावत आहे. मंगलमूर्तींच्या आगमनाबरोबरच पाऊस सुरू झाल्याने गणेशभक्तांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गेल्या पाच दिवसात सर्वत्र ३० ते ५० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यासह सर्वच घटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भीज पावसामुळे अनेक भागात विहिरींना पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे.

समाधानकारक वातावरण आहे. पोळ व रांगडा कांद्याची लागवड वाढली आहे. भाजीपाला लागवड सुरू झाली आहे.

पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून कसमादे पट्ट्यात होत असलेल्या पावसाने पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल.

ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी प्रथमच मोठा पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरले आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांना काम मिळू लागले आहे. पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा वेग येणार आहे.

गेल्या तीन महिन्यापासून कसमादे परिसरात पावसाने ओढ दिल्याने नैराश्‍याचे वातावरण होते. पावसामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेची चाके पुन्हा फिरू लागली आहेत.

डाळिंबासह इतर फळ पिकांना पाऊस फायदेशीर ठरत आहे. परतीचे आणखी दोन तीन मोठे पाऊस झाल्यास पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT