Nashik News : राज्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नाहीये. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून पावसाची वाट पाहिली जात आहे. यादम्यान महिनाभरापासून ओढ घेतलेल्या पावसाचे गुरुवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार आगमन झाले. शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे अवघ्या तीन तासात शहरात २५.८ मि मी पावसाची नोंद झाली.
आज (शुक्रवार) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहयला मिळाले. शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा या बाजारपेठांमध्ये देखील रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहयला मिळाले.
नाशिक शहरासोबतच गंगापूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाची संतत धार सुरू असून पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरनातून पूर दुपारी एक वाजता ५०० क्यूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढविला जाणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.
कळवण तालुक्यासह पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाल्यामुळे आज गिरणा नदीला या हंगामातील पहिल पूर आला आहे. तसेच सावकी, विठेवाडी ता देवळा येथे गिरणा नदी पुलावरून दुथडी भरून वाहत आहे.
अभोणा येथील परिसरात सलग दुसऱ्यादिवशीही सुरू असलेल्या दमदार पावसाने, अभोणा परिसर जलमय झाला आहे. चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात ३ हजार ९६५ व पाट कॅनॉल क्षेत्रात ९० क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग केल्याने नदी नाल्यांना पूर आले.(Latest Marathi News)
घर कोसळून दोघांचा मृत्यू
नाशिक शहरासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. आज पहाटे दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे पावसामुळे जुने घर कोसळुन गुलाब वामन खरे (आजोबा) निशांत विशाल खरे (नातू ) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ढिगा-याखाली अडकलेल्या आजी विठाबाई गुलाब खरे यांना सुखरुप बाहेर काढण्यात तालुका प्रशासनाला यश आले. दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढली असून मुसळधार पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग (दुपारी 1 वाजेपर्यंत)
कडवा-280 क्यूसेक
पुणेगाव-590 क्यूसेक
गंगापूर -514 क्यूसेक
दारणा-1400 क्यूसेक
नांदुरमध्यमेश्वर-300 क्यूसेक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.