Water released into the Kadwa River due to Karanjavan Dam being full. esakal
नाशिक

Nashik Rain Update: करंजवण धरण 100 टक्के भरले! 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : दिंडोरी तालुक्यात तीन दिवस पावसाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांमघ्ये आनंदाचे वातावरण आहे. शनिवारी (ता. २३) सांयकाळी दिंडोरीच्या पश्चिम भागत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने करंजवण धरण रात्री नऊच्या दरम्यान १०० टक्के भरले.

त्यामुळे सुरवातीला ३०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडला. मात्र, धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा रात्री अकराला धरणातून १,५०१ क्यूसेक विसर्ग वाढविण्यात आला.

पाण्याची आवक सुरूच राहिल्यास करंजवण धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुभम भालके यांनी दिली. (Nashik Rain Update Karanjavan Dam 100 percent full 1500 cusec water discharge started)

मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने पुणेगाव धरणातून कॅनॉलद्वारे १२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग डवचवाडीकडे सोडला असून, पुणेगाव धरण ९७ टक्के भरले असून, धरणातून उनंदा नदी सोडलेला पाण्याचा विसर्ग बंद केल्याने ओझरखेड धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर स्थिर आहे.

वाघाड धरण १०० टक्के भरले असून, धरणाच्या साडव्यातून शनिवारी १५४ क्यूसेक विसर्ग सुरू होता. मात्र, रात्री झालेल्या पावसामुळे २६३ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. शनिवारी रात्रीपर्यंत पालखेड धरणातून कादवा नदीत २१८ क्यूसेक विसर्ग सुरू होता.

करंजवण धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मध्यरात्री तीनला पालखेड धरणातून १,७४८ क्यूसेक विसर्ग वाढविला असून, पालखेड धरणाचा साठा ९७ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.

तिसगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण अत्यअल्प असल्यामुळे तिसगाव धरणात ४९ टक्के साठा आहे. तिसगाव धरणाला अजून पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

"सध्या तालुक्यात वळीव स्वरुपाच्या पाऊस सुरू आहे. हा पाऊस धरण क्षेत्रात पडत असल्याने करंजवण, पालखेड, वाघाड धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. करंजवण, पालखेड धरणातून विसर्ग वाढवावा लागत आहे. यामुळे कादवा नदीकाठावरील गावांना सावधानेचा इशारा दिला आहे. कारण पाणी कमी अधिक प्रमाणात सोडल्यास कादवा नदीवरील पूल पाण्याखाली जातात. पुलावरून किंवा धरणाजवळून प्रवास करता वाहनधारक किंवा प्रवासी, जनावरे, विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी."

-शुंभम भालके, शाखा अभियंता, करंजवण धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT