Nashik Rain Update : ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता.
त्यानंतर उंबरदरी धरण परिसरातही सतत पडणाऱ्या पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले. धरणावर जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, तूर्त योजनेचा पाणीप्रश्न मिटला आहे.
गेल्या वर्षी १३ जुलैला भरलेले धरण यंदा १८ दिवसांनी उशिरा ओव्हरफ्लो झाले. (Nashik Rain Update Umbardari Dam Overflow water problem of many villages solved)
भोजापूरमुळे भागणार ३९ गावांची तहान
भोजापूर धरणावर सिन्नर तालुक्यातील मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह पाच गावे आणि संगमनेर तालुक्यातील निमोणसह नावे, अशा तीन पाणी योजना आहेत. दोन्ही तालुक्यांतील मिळून सुमारे ३१ गावांना धरणातून पाणीपुरवठा होतो.
त्यामुळे धरणात जिवंत पाणीसाठा होणे गरजेचे आहे. धरणातून पूरपाणी परिसरात आणि रब्बीसाठी आवर्तन सोडले जाते.
म्हाळुंगी नदीचा उगम ठाणगावच्या पाचपट्टा किल्ला परिसरातून होतो. या भागात काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने म्हाळुंगी नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. उंबरदरी धरण भरल्याने भोजापूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
सिन्नर तालुक्यातील कोनांबे, बोरखिंड व उंबरदरी धरण १०० टक्के भरले असून, भोजापूर ५७ टक्के भरले आहे; तर दातली, माळवाडी व दुसंगवाडी धरणात मृत साठा आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात अजूनही नदी, नाले कोरडेठाक असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पेरणी केलेल्या पिकांना पावसाची आवश्यकता आहे.
वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतेत आहे. कडवाच्या पाण्यावर व देव नदीच्या पाण्यावर शेती सिंचनाचे काम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.