नाशिक : ऐन पावसाळ्यात दडी मारलेल्या वरुणराजाने आदिवासी भागामध्ये मंगळवारी (ता. १४) सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी केली. सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत इगतपुरीमध्ये १५३, पेठ- १४९, सुरगाणा- ७०.२, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे धरणांमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे नांदूर मधमेश्वरमधून आतापर्यंत ११ टीएमसी पाणी रवाना झाले आहे.
दारणा धरणातून १२ हजार ७८८, कडवा- ४ हजार २४०, आळंदीमधून- ८०, वालदेवी- ५९९, गंगापूर- २ हजार २१२, नांदूर मधमेश्वर- २६ हजार २४६ क्युसेस विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. आज सकाळपर्यंत रामकुंडाशेजारील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीची पातळी पोचली होती. त्यानंतर पातळी हळूहळू कमी होत, सायंकाळपर्यंत ही पातळी गुडघ्यापर्यंत पोचली होती. आज सकाळी आठपर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : नाशिक- १७, दिंडोरी- ११, मालेगाव- २, चांदवड- १, कळवण- १०, बागलाण- ४.२, देवळा- २.८, सिन्नर- ११, तर निफाड आणि येवला तालुक्यात पावसाने उघडीप दिली. तालुकानिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी अशी : नाशिक- ५३.२४, इगतपुरी- ९६.२१, दिंडोरी- ६७.५९, पेठ- ९८.०९, त्र्यंबकेश्वर- ७२.६८, मालेगाव- ११६.०४, नांदगाव- १३४.७४, चांदवड- ४७.५९, कळवण- ७२.८६, बागलाण- ८६.८७, सुरगाणा- ९७.३८, देवळा- १०२.४८, निफाड- ९८.८०, सिन्नर- ६६.०५, येवला- ९३.६९.
धरणांमधील जलसाठा (टक्के)
जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत झालेल्या जलसाठ्याची टक्केवारी अशी : दारणा- ९७.५४, मुकणे- ७१.०६, भावली- १००, वालदेवी- १००, गंगापूर-९७.६९, कश्यपी- ७९.७०, गौतमी गोदावरी- ९१.२७, कडवा- ९९.१७, आळंदी- १००, भोजापूर- ३२.१३, पालखेड- ९५.५६, करंजवण- ५५.०४, ओझरखेड- ३९.१५, वाघाड- ९३.८३, तिसगाव- २३.३०, पुणेगाव- ८९.७३, चणकापूर- ९३.४९, हरणबारी- १००, केळझर- १००, नाग्यासाक्या- १००.
उत्तर महाराष्ट्रातील पाऊस
(आकडे टक्केवारीमध्ये दर्शवतात)
जिल्हा आताचा पाऊस गेल्यावर्षीचा पाऊस
नाशिक ८७.९१ ९५.९०
धुळे १११.५२ १३५.२२
नंदूरबार ५७.९१ ६८.४७
जळगाव १०५.७५ १२९.९१
नगर १२९ १६७.४
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.