Dr. Rathi  esakal
नाशिक

Nashik Dr. Rathi Attack : डॉ. राठी हल्ला प्रकरणातील संशयित राजेंद्र मोरेला कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dr. Rathi Attack : पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी (वय ४९) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित राजेंद्र मोरे (वय ३७, रा. नाशिक) यास रविवारी (ता. २५) न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची (२ मार्चपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (nashik dr Rathi attack marathi news)

दरम्यान, डॉ. राठी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. डॉ. राठी यांच्यावर शुक्रवारी (ता. २३) रात्री संशयित राजेंद्र मोरे याने सुयोग हॉस्पिटलमध्ये जाऊन कोयत्याने १९ वार करीत जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर फरारी झालेल्या संशयित मोरे यास शनिवारी (ता. २४) सायंकाळी अटक केली होती. तपासादरम्यान आपल्या घराजवळ व सध्या पत्नी नोकरी करीत असलेल्या परिसरात तिची बदनामी करणारे पत्रक छापून वाटप केले होते, यामागे डॉ. राठी असल्याचा संशय आल्याने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याचे संशयित हल्लेखोराने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

संशयित मोरेची पत्नी सुयोग हॉस्पिटलमध्ये नोकरीला असताना तिने सुमारे पाच लाखांचा अपहार केल्याचे समोर आल्याने तिला डॉ. राठी यांनी नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिला पुन्हा डॉ. राठी यांनी हॉस्पिटलऐवजी त्यांच्या जमिनींच्या कागदपत्रांची नोंदणी व इतर खासगी कामासाठी नोकरीवर रुजू करून घेतले होते.

परंतु, त्यातही अपहार केल्याने राठी यांनी तिला व तिचा पती राजेंद्र याला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेत अपहार केलेल्या रकमेची मागणी केली. त्यावर थोडा वेळ मागत पैसे परत करणार असल्याचे मोरे याने सांगितले होते. यातूनच डॉ. राठी यांच्यावर हल्ला केल्याचे समोर येत आहे. संशयित मोरे याच्या चौकशीतून आणखीही काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT