Bakery Products  esakal
नाशिक

Nashik Ramadan Eid Festival : रमजान पर्वामुळे बेकरी व्यवसाय तेजीत! दररोज 3 हजार गोणी मैदाची विक्री

Nashik News : रमजान पर्वात दैनंदिन खर्चात वाढ होत असते तसेच या महिन्यात अनेकांच्या हाताला रोजगारही मिळतो.

जलील शेख

मालेगाव : रमजान पर्वात दैनंदिन खर्चात वाढ होत असते तसेच या महिन्यात अनेकांच्या हाताला रोजगारही मिळतो. उद्योगधंदे जोमात असतात. रमजान पर्वामुळे येथील नान व्यवसायाला यंदा झळाळी आली आहे. नान (मोठा पाव) बनविण्यासाठी रोज सुमारे तीन हजार गोण्या मैदा विकला जातो. यातून अनेकांना तात्पुरत्या स्वरुपाचा रोजगारही मिळाला आहे. (Nashik Ramadan Eid Festival 2024 Bakery business booming in malegaon marathi news)

शहरात रमजान महिना सुरु होताच प्रत्येक बेकरीत नान बनविले जातात. रमजानमध्ये येथे रोज दीड लाख किलो मैद्याचे नान बनविले जातात. त्यामुळे मालेगाव हे नानच्या बाबतीत आपली नवी ओळख बनवित आहे. येथून छत्रपती संभाजीनगर, भिवंडी, मुंबई, नाशिक, पडगा, धुळे तसेच चांदवड यासह कसमादेत अनेक ठिकाणी नान विकला जातो.

मुस्लीम बांधवांबरोबरच हिंदू बांधवही नानचा स्वाद घेतात. वर्षातून एकदाच मैदाचे नान मिळत असल्याने नान खाण्याकडे सर्वांचा कल आहे. येथे सुमारे अडीचशे बेकऱ्या असून या बेकऱ्यांतून रोज अडीच ते तीन लाख नान पाव तयार होतात.

नानचे प्रकार

शहरात बेकरी चालक वेगवेगळे प्रकारचे नान बनवितात. प्रत्येकाचा वेगळा ब्रॅन्ड असल्याने चवही वेगळी असते. येथे काजू नान, पराठा नान, मावा, चायना नान, चौकोन नान, गोल, दुध नान, यासह शेकडो प्रकार बनविले जातात. यात सर्वात जास्त काजू, पराठा व मावा नान यांना पसंती देतात. २० ते ६० रुपयांपर्यंत नानची विक्री होते. सर्वसामान्य नागरीक सर्वात जास्त २० रुपयाच्या नानचा वापर करतात. येथे तयार होणारे नान शंभर ग्रॅमपासून ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंत बनविले जातात.  (latest marathi news)

मैद्याचा वापर वाढला

रमजान पर्वात नान व्यवसाय जोरात असतो. नान बनविताना मैदा, दूध, काजू यासह विविध पदार्थांचा वापर होतो. येथे मैद्याची रोज ३ हजार गोण्यांची विक्री होते. रमजान वगळता येथे सुमारे पाचशे ते हजार गोण्या विकल्या जातात. मैद्यात विविध प्रकार असून ५० किलोची गोणी १ हजार ६०० रुपयाला मिळते. यात के.एन., डायमंड या मैद्याचा वापर जास्त होतो. शहरात उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश या राज्यातून मैदा येत असल्याचे मैद्याचे व्यापारी नटवरलाल देसाई यांनी सांगितले.

महिनाभर मिळतो रोजगार

रमजान पर्वामुळे येथे चैतन्याचे वातावरण असते. नागरीकांच्या खर्चात दुप्पटीने वाढ होते. रोजा ठेवण्यासाठी अनेक नागरीक दुध नान खातात. येथे दुध डेअरी, बेकरी, हातगाड्या, खजूरच्या दुकानावर, चहा हॉटेलजवळ, पान दुकानाजवळ यासह विविध ठिकाणी नान विक्रीसाठी असतात. रात्रभर येथे नान मिळतो.

"शहरात नान खाण्याची प्रथा बनली आहे. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणपेक्षा ९० टक्के नान शहरात तयार होतो. येथून इतर ठिकाणीही नान विक्रीस जातो. हिंदू बांधवही नानचा आस्वाद घेतात."- हबीब शेख, संचालक, नवाब बेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT