Work in progress to set up shop at Chowk Mandai for Iftar Bazaar  esakal
नाशिक

Ramadan Eid Festival : मुस्लिम बांधवांच्या चंद्रदर्शनाकडे नजरा; दर्शन घडल्यास रमजान पर्व सुरू

Nashik News : सोमवार (ता.११) सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यास मंगळवार (ता. १२) रमजान पर्वास सुरवात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : सोमवार (ता.११) सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यास मंगळवार (ता. १२) रमजान पर्वास सुरवात होणार आहे. मुस्लिम बांधवांच्या नजरा चंद्रदर्शनाकडे लागल्या आहेत. इस्लामी कालगणनेनुसार सोमवारीच चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे. (nashik Ramadan Eid Festival marathi news)

घराची स्वच्छता करण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे काम करून घेतले जात आहे. मशिदीची रंगरंगोटी आणि स्वच्छता सुरू आहे. बहुतांशी मशिदीमध्ये अशा प्रकारची कामे पूर्ण झाल्याने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रमजान पर्वात विशेष नमाज असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता नमाजासाठी अतिरिक्त व्यवस्था केली जात आहे.

महिनाभर मुस्लिम बांधवांकडून रोजा केला जात असल्याने सूर्योदय पूर्वी सहेरी आणि सूर्यास्तानंतर इफ्तार केले जाते. यासाठी फळ, विविध खाद्यपदार्थ उपलब्ध होत असतात. अशा खाद्यपदार्थांसह विविध फळांच्या दुकानांची महिनाभर विशेष बाजारपेठ असते.

सायंकाळी चार ते साडेसहाच्या दरम्यान दूध बाजार, बागवानपुरा, चौक मंडई, वडाळा रोड, वडाळा गाव चौफुली अशा विविध ठिकाणी बाजार भरत असतो. त्यानिमित्ताने तात्पुरत्या दुकाने उभारण्याच्या कामासही वेग आला आहे. चिमुकल्यांसह सर्वच मुस्लिम बांधवांचा उत्साह शिगेला पोचला आहे. चंद्रदर्शनानंतरच रमजान पर्वास प्रारंभ होणार आहे.

सोमवारी उर्दू शाबान महिन्याची २९ तारीख येत असल्याने चंद्र दर्शनाची दाट शक्यता आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी चंद्रदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. दर्शन घडताच धर्मगुरूंना याबाबतची शहादत (माहिती) द्यावी, असे आवाहन मौलवी आणि धर्मगुरूंकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

पोलिसांना बैठकीचा विसर

रमजान पर्व सुरू होण्याच्या पूर्वी पोलिस विभागाकडून नियोजनासंदर्भात मुस्लिम बांधव, धर्मगुरू, शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली जाते. दुपारी चारपासून तर सायंकाळी पावणेसातपर्यंत लागणाऱ्या इफ्तार बाजारनिमित्त दूध बाजार ते मौलाबाबा दर्गा चौकापर्यंत मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जातो.

त्याचप्रमाणे चौक मंडई बागवानपुरा भागातीलही मार्ग बॅरिकेटिंग लावून बंद केला जातो. दुकाने कशा पद्धतीने लावाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अशा विविध प्रकारचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून बैठक घेतली जाते. यंदा मात्र एक दिवसावर रमजान येऊन ठेपले असतानाही बैठक झाली नाही. त्यांना बैठकीचा विसर पडल्याची चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT