A banner tied to a tree on the Kamtwara Link Road road. In the second photo, a board nailed to a tree. A commercial banner placed in the last photograph. esakal
नाशिक

Nashik News : सिडकोत गुदमरतोय झाडांचा श्‍वास; अनेक झाडांवर खिळे ठोकून सर्रास जाहिरातबाजी

Nashik : शहरातील सिडको परिसरातील अनेक झाडांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे जाळे निर्माण झाले असल्यामुळे या झाडांचा श्‍वास गुदमरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील सिडको परिसरातील अनेक झाडांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे जाळे निर्माण झाले असल्यामुळे या झाडांचा श्‍वास गुदमरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वृक्ष संवर्धन तसेच वृक्ष लागवडीच्या उपक्रमाखाली नाशिक महापालिका तसेच अनेक सेवाभावी संस्था दरवर्षी पावसाळ्यात हजारो रोपांची लागवड करत असते नंतर त्यांचे वटवृक्षात रूपांतर होते. अशा मोठ्या वटवृक्षांवर सिडको परिसरात अनेक व्यावसायिकांनी चक्क खिळे ठोकून त्यावर आपली जाहिरात करत आहे. (Rampant advertising by nailing to many trees in cidco )

केल्याचे अनेक जाहिरातीसाठी झाडांवर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकून जाहिराती केलेल्या असून त्यामुळे जिवंतपणे झाडांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे. अनेक ठिकाणी झाडांना तारांचा विळखा घालून जणूकाही झाडांची मान आवळण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी केलेला दिसतो. खासगी क्लासेस, जमीन विक्रीचे दलाल तसेच व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी अशा भव्य जाहिराती झाडावर लावून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

झाडांना सुद्धा मोकळेपणाने जगण्याचा अधिकार असून त्यांच्यावर अशा प्रकारे जाहिरात बाजी करून झाडांची कोंडी थांबवणे गरजेचे आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या वाक्याप्रमाणे शहरातील सुशोभीकरण करण्यासाठी अनेक झाडांचा उपयोग होत असतो आणि अशा जाहिरातींमुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत असून शहरात पर्यावरणाचे विद्रूपीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अशा जाहिरात करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. (latest marathi news)

''परिसरात अनेक ठिकाणी झाडांवर जाहिरात करत नागरिक त्यांच्यावर अत्याचार करत आहे. झाडे हे जाहिरात करण्याचे ठिकाण नसून त्यांचे रक्षण करणे आपले जबाबदारी आहे त्यामुळे झाडांवर अशा प्रकारच्या जाहिराती नागरिकांनी करू नये.''- सुदीप नलावडे, वृक्षप्रेमी

''अनेक वेळा झाडांवर खिळे ठोकून अनेक बोर्ड बसवले जातात. झाडांचीही वाढ होत असून त्यांनाही याचा त्रास होत असेल. शहराचे सुशोभीकरण बिघडविणाऱ्या अशा नागरिकांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.''-किरण बर्वे,वृक्षप्रेमी

''खासगी क्लासेस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यासाठी अशा झाडांचा वापर केला जातो. मोठे फ्लेकस अशा झाडांवर काही वेळा लावले जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्या नागरिकांवर चपराक बसवणे हे गरजेचे आहे.''- कुणाल बेळे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT