There is encroachment on the footpaths made for citizens in the city by parking signs of shops and vehicles. esakal
नाशिक

Nashik Encroachment : वाहतुकीला अडथळा ठरणारे रॅम्प, बोर्ड हटविणार! अतिक्रमण विभागाचा निर्णय

Nashik News : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमण वाढतं आहे. परंतु पावसाळ्यात रहिवासी अतिक्रमण हटविता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच त्या रस्त्याला लागून असलेल्या समांतर रस्त्यावरील दुकानांचे रॅम्प. (Ramps and boards that obstruct traffic will be removed)

जाहिरात बोर्ड, स्टील रेलिंग जप्त केले जाणार आहे. जेणेकरून दुकानांसमोरील जागा दुचाकी पार्किंगसाठी वापरात येऊन रस्त्यावरील पार्किंग आत ढकलले जाईल व रस्ता वाहतुकीला मोकळा होईल. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना लक्षवेधी सूचना मांडल्याने त्या पार्श्‍वभूमीवर शरणपूर रोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवरील हॉटेल्सचे रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविण्यात आले.

यामुळे शहरातील मोठ्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र गावठाण भागामध्ये वाहतूक ठप्प होण्यास दुकानांचे अतिक्रमण कारणीभूत ठरत असल्याने अतिक्रमण विभागाने आता या भागाकडे मोर्चा वळविला. मुख्य रस्त्यांवरील दुकानांचे रॅम्प, पायऱ्या या फुटपाथवर बांधण्यात आल्या आहेत. फुटपाथवर दुकानांच्या जाहिरातीचे बोर्ड लावले गेल्याने वाहतुकीस अडथळा ठरतो. त्यामुळे लोक नाइलाजाने रस्त्यावर चालतात, त्याचप्रमाणे दुचाकी वाहनेदेखील रस्त्यावर लावली जातात.

त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे हे एक प्रमुख कारण असल्याने या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या समांतर रस्त्यांवर असलेल्या दुकानांच्या अतिक्रमणांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. जेणेकरून समांतर रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होऊन त्याचा परिणाम मोठ्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यावर होईल असा दावा करण्यात आला आहे. (latest marathi news)

आकाशवाणी गाळे विक्रेत्यांवर कारवाई

महापालिकेकडून आकाशवाणी टॉवर येथे व्यावसायिक गाळे बांधण्यात आले असून ते गाळे ताब्यातदेखील देण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये व्यवसाय न करता रस्त्यावरच भाजी विक्रेते बसतात. अशांवर कारवाई करताना त्यांच्याकडून गाळे ताब्यात घेण्याबरोबरच व्यवसाय करणाऱ्यांना पाच बाय पाच फूट आकाराचे गाळे दिले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी दिली.

पथविक्रेता कारवाई, शासनाकडून मार्गदर्शन

पथविक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. महापालिका क्षेत्रात ८,५९६ पथविक्रेत्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले. पथविक्रेता समिती सदस्य नियुक्तीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानंतर पथविक्रेत्यांचे फेरसर्वेक्षण करून पथविक्रेत्यांना व्यवसाय परवाना दिला जाणार आहे.

एकीकडे कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे शहरातील पथविक्रेत्यांविरोधात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईदेखील सुरू करण्यात आल्यानंतर नॅशनल हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन व कामगार एकता युनियन या संघटनांनी कारवाई विरोधात शासनाला निवेदने दिली.

त्यानुसार शासनाने अस्तित्वातील सर्व पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याशिवाय आणि त्यांना व्यवसाय प्रमाणपत्र दिल्याशिवाय , आहे त्या जागेवरून हटविता येणार नसल्याचे निर्देश दिले. परंतु कारवाई थांबविल्यास अतिक्रमणे वाढण्याची भीती असल्याने महापालिकेकडून शासनाकडे मार्गदर्शन मागविले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी दिली.

"रस्त्याच्या समोर दुकानांचे रॅम तयार करण्यात आले. त्याचबरोबर स्टीलचे रॅक लावण्यात आले असून, जाहिरातीचे बोर्डदेखील आहे परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक ठप्प होण्याची प्रकार घडतात. त्यामुळे यावर कारवाईला लवकरच सुरवात केली जाणार आहे." - मयूर पाटील, उपायुक्त, अतिक्रमण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT