नाशिक : शहरात शनिवारी (ता. ३०) रंगपंचमी सेलिब्रेशनसाठी तरुणाईचा उत्साह दिसून येत आहेत. त्यासाठी पंचवटी, जुने नाशिकमधील पेशवेकालीन रहाडी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र रंगपंचमी करताना तरुणाईने खबरदारी घेण्याचा इशारा देतानाच, छेडछाड करणाऱ्याविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी रहाडी व शॉवरच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, साध्या वेशातील पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी करडी नजर ठेवली जाणार आहे. (Nashik Rang Panchami 2024 Police Watch news )
शनिवारी (ता. ३०) शहरात रंगपंचमी साजरी करण्यासाठी तरुणाईची सकाळपासूनच गर्दी राहणार आहे. दिवसभर रहाडीच्या ठिकाणी हजारो तरुणाईच डुंबण्याचा आनंद घेतील. मात्र, या वेळी काही समाजकंटक तरुणांकडून तरुणी, महिलांची छेडछाड करण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांकडून पंचवटी व जुने नाशिकमधील रहाडींच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
एवढेच नव्हे तर, रहाडी व शॉवरच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे छेडछाड करणाऱ्यावर वॉच ठेवला जाणार आहे. याशिवाय परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलिस बंदाबेस्त ठेवतानाच, साध्या वेशातील पुरुष व महिला पोलिसांची नेमणूक केली आहे. त्यामुळे मद्यपी तरुणांसह छेडछाड करणाऱ्यावर धडक कारवाई केली जाणार आहे. (latest marathi news)
असा आहे बंदोबस्त
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त किरण चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पंचवटीचे वरिष्ट निरीक्षक मधुकर कड, भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र चव्हाण यांच्यासह २५० अधिकारी, कर्मचारी, १०० होमगार्डचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
"रंगपंचमीनिमित्त तरुणांनी गर्दी करताना सावधगिरी बाळगावी. कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. महिलांना त्रास होणार नाही याच्याही सूचना आयोजकांना देण्यात आलेल्या आहेत. रहाड परिसरात मद्यपी आल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. यासाठी पंचवटी व जुने नाशिक परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे."
- किरणकुमार चव्हाण, उपायुक्त, परिमंडळ एक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.