जुने नाशिक : पवित्र गोदावरीच्या पाण्याने मधली होळी राहाडीच्या रंगोत्सवास ७५ वर्षानंतर उत्साहात प्रारंभ झाला. उदयन दीक्षित रहाडीची पूजा आणि पहिल्या डुबकीचे मानकरी ठरले. स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या खोदकामाने रहाड ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा पुनर्जीवित झाली आहे. (Nashik Rang Panchami After seventy five years Rangotsav in Madhali Holi news)
पारंपारिक रहाडीत रंग खेळण्याची शहरास संस्कृती आहे. जुने नाशिक आणि पंचवटी शनीचौक राहडींमध्ये रंग खेळण्यासाठी शहरभरातील रंगप्रेमींची गर्दी उसळत असते. राहाडीत रंग खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. जुन्या जाणकारांकडून सुमारे २२ रहाडी असल्याचे सांगितले जाते.
त्यातील सर्वाधिक जुने नाशिक परिसरात असल्याचेही सांगण्यात येते. सध्या काजीपुरा, जुनी तांबट लेन, तिवंधा चौक, गाडगे महाराज पूल परिसरात तसेच पंचवटी येथील शनी चौक भागात पेशवेकालीन रहाडी आहेत. रंगपंचमीच्या दिवशी यात रंग खेळला जातो. आता यात मधली होळी भागातील आणखी एका रहाडीची भर पडली आहे.
मंत्रोच्चाराच्या जयघोषात पारंपारिक पद्धतीने उत्साहात रंगत्सव साजरा करण्यात आला. महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येऊन त्यांच्या सुरक्षीतेकडे लक्ष केंद्रित करण्यात आले होते. रहाडीचा पहिला रंग गुलाबी ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे कामानिमित्ताने अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेले परिसरातील कुटुंबीय इतक्या वर्षानंतर मधली होळी रहाड पुनर्जीवित झाल्याने त्यात रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिले होते.
स्वातंत्र्याच्या तीन वर्षानंतर रहाड बंद
१९५० साली काही कारणास्तव ही रहाड बंद करण्यात आली होती. जुने नाशिक परिसरात स्मार्टसिटी अंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत मधली होळी भागात खोदकाम सुरू असताना रहाडीचा काही भाग उघडा पडला.
मधली होळी तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत, राहडीच्या उघड्या पडलेल्या भागाची विधिवत पूजा केली. रंगपंचमीच्या दिवसापासून तब्बल ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा रहाडीस पुनर्जीवित करून रहाड रंगोत्सवास प्रारंभ केला. तालीम संघाचे अध्यक्ष सतीश काथे, भुषण जुन्नरे, चिन्मय देव यांच्यासह कार्यकर्त्यांमुळे रंगोत्सव यशस्वी झाला. (latest marathi news)
विविधत पुजन
तब्बल ७५ वर्षानंतर मधली होळी रहाड उघडण्यात आली. त्यानिमित्ताने परिसरातील महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून पवित्र गंगा गोदावरीचे पाणी आणून रहाडीत समर्पित केले. त्यानंतर पारंपारिक वातावरणात रंगोत्सव साजरा झाला.
सातपूरला रंगपंचमी उत्साहात
सातपूर परिसरात विविध रंगाची उधळण करत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच परिसरात रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. सातपूर कॉलनी, सावरकरनगर, अशोकनगर, श्रमिकनगर, जाधव संकुल, शिवाजीनगर, गणेशनगर परिसरात एकमेकांना रंग लावण्यासाठी ठिकठिकाणी बाळ गोपाळसह मोठ्यांची गर्दी दिसून येत होती.
गल्लीबोळात लहानमुलांचा रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. सकाळी सातपासूनच लहान मुलांसह मोठ्यांनी रंगाची उधळण करण्यास सुरवात केली होती. ठिकठिकाणी पिचकारी, फुगे, तसेच विविध रंगानी दुकाने सजली होती. काही जणांनी पाणी बचतीचा संदेश देत कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.