Peshwa Traditional Rahad esakal
नाशिक

Nashik Rangpanchmi 2024 : जुने नाशिकमध्ये यंदा 17 ठिकाणी रंगोत्सव

Rangpanchmi 2024 : यंदा रंगपंचमीत जुने नाशिक परिसरात १७ ठिकाणी रंगोत्सवाची रंगत बघावयास मिळणार आहे. ५ ठिकाणी पारंपरिक पेशवेकालीन रहाड, तर १२ ठिकाणी शॉवरने रंगाची उधळण होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rangpanchmi 2024 : यंदा रंगपंचमीत जुने नाशिक परिसरात १७ ठिकाणी रंगोत्सवाची रंगत बघावयास मिळणार आहे. ५ ठिकाणी पारंपरिक पेशवेकालीन रहाड, तर १२ ठिकाणी शॉवरने रंगाची उधळण होणार आहे. अवघ्या तीन दिवसांवर रंगपंचमी येऊन ठेपली आहे. विविध रंग आणि पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे. चिमुकल्यांसह तरुणाई रंगपंचमीची आतुरतेने वाट पाहत आहे. (Nashik Rangpanchami 2024 Rangotsav at 17 places in Nashik marathi news)

जुने नाशिक परिसरात सर्वाधिक उत्साहात रंगपंचमी साजरी होत असल्याने तयारी वेग आला आहे. पेशवेकालीन पारंपरिक रहाड रंगोत्सवाची परंपरा येथे आजही टिकून आहे, तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीला आधुनिकतेचा टच देण्यात येऊन शॉवर रंगोत्सव साजरा होत आहे. यंदा जुने नाशिक परिसरात १७ ठिकाणी रंगोत्सवाची रंगत रंगणार आहे. ५ ठिकाणी रहाड, तर १२ ठिकाणी शॉवरने रंगोत्सवाची रंगत वाढणार आहे.

दरवर्षी तिवंधा चौक, काझीपुरा, जुनी तांबट गल्ली, दिल्ली दरवाजा अशा चार ठिकाणी रहाड रंगोत्सव साजरा होत असतं. यंदा त्यात आणखी एका रहाडीची भर पडली आहे. मधली होळी परिसरात रहाडही या वर्षी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे जुने नाशिक परिसरातील रहाडींची संख्या पाच झाली आहे. अन्य १२ ठिकाणी शॉवरने रंगांची उधळण होणार आहे. रंगप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (latest marathi news)

त्यांना केवळ प्रतीक्षा लागून आहे, ती रंगपंचमीच्या दिवसाची. भद्रकाली पोलिस ठाण्यात रंगोत्सव साजरा करणाऱ्या १६, तर सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका मंडळाकडून नोंद करण्यात आली आहे.

येथे होणार रंगोत्सव

तीवंधा चौक हिंदमाता सेवक मंडळ, काझीपुरा दंडे हनुमान मित्रमंडळ, जुनी तांबट लेन रहाड उत्सव समिती, मधली होळी तालीम संघ, दिल्ली दरवाजा, मेनरोड शिवसेना मित्रमंडळ, भद्रकाली कारंजा नवजीवन मित्रमंडळ, श्री कानडे मारुती मित्रमंडळ, वावरे लेन छत्रपती शिवाजी महाराज रोड मित्रमंडळ, सोमवार पेठ प्रसाद युवक मित्रमंडळ, कानडे मारुती लेन गजानन मित्रमंडळ, मेनरोड प्रेरणा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, दहिपूल पिंपळपार नेहरू चौक मित्रमंडळ, हुंडीवाला लेन राजमुद्रा मित्रमंडळ, शिवाजी तरुण मित्रमंडळ, मिरजकर लेन न्यू एकता फ्रेंड सर्कल मंडळ, रोकडोबा मित्रमंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT