Photography  esakal
नाशिक

Photography : ‘एआय’ फोटोग्राफीमुळे खरा ‘आर्टिस्ट’ दुर्लक्षित; फोटो स्टुडिओही झाले कालबाह्य

Nashik News : एआय तंत्रज्ञान डिजिटल फोटोग्राफीमुळे घरगुती इव्हेंट मोबाईलमध्ये कॅप्चर केले जातात. यामुळे फोटो स्टुडियोबरोबरच फोटोग्राफर आर्टिस्ट दुर्लक्षित झाला आहे.

दीपिका वाघ

Nashik News : पूर्वी लग्नासाठी मुलीचा फोटो काढणे, शैक्षणिक फॉर्म, नोकरीसाठी पासपोर्ट फोटो काढण्यासाठी फोटो स्टुडिओत जावे लात. आता फॉर्म भरताना डिजिटल कॉपी तसेच एका पासपोर्ट फोटोचे ५० फोटो मिळत असल्याने एकदा फोटो काढल्यानंतर पुन्हा स्टुडिओत जाण्याची वेळच येत नाही. (Real Artist Neglected due to AI Photography)

त्यानंतर वाढदिवस, डोहाळे जेवण, मुंज, घरभरणी, लग्नकार्यासाठी आवर्जून फोटोग्राफर बोलविले जायचे. आता एआय तंत्रज्ञान डिजिटल फोटोग्राफीमुळे घरगुती इव्हेंट मोबाईलमध्ये कॅप्चर केले जातात. यामुळे फोटो स्टुडियोबरोबरच फोटोग्राफर आर्टिस्ट दुर्लक्षित झाला आहे. कॅमेऱ्याच्या एका रोलमध्ये ३६ फोटो काढले जात. त्यामुळे एक ‘परफेक्ट’ फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरचा कस लागायचा.

शिवाय एक फोटो क्लिक केल्यानंतर निगेटिव्ह, लॅब टेस्टसाठी किंमत मोजावी लागायची. त्यासाठी फोटोग्राफरला ‘प्रॅक्टीस’ करावी लागायची, अभ्यास करून फोटो काढला जायचा. फोटो लॅबमध्ये टेस्टिंगला दिल्यानंतर निगेटिव्ह कॉपीनंतर फोटो कसा आला ते समजायचे. तेव्हा फोटो बघण्याची उत्सुकता असायची आणि सुंदर आठवणी अल्बमच्या रूपात पुढील पिढीसाठी राखून ठेवल्या जायच्या.

आता तंत्रज्ञानात बदल झाला तसे २००३ पासून डिजिटल कॅमेरे बाजारात यायला सुरवात झाली. रोल, लॅब टेस्ट, निगेटिव्ह पध्दत बंद झाली आणि फोटो बघण्याची उत्सुकता विरून गेली. डिजिटल कॅमेऱ्यामुळे कोणताही सराव न करता अनेक लोक या क्षेत्रात यायला लागले. क्लिक केल्यानंतर इन्स्टंट फोटो बघायला मिळतो म्हणून फोटोचा अँगल कळतो.

रोलमध्ये ३६ फोटोची मर्यादा असल्याने प्रत्येक फोटो परफेक्ट येण्यासाठी फोटोग्राफरचे कष्ट असायचे. आता एक अँगल ५० वेळा क्लिक केल्यानंतर त्यातील एक फोटो परफेक्ट निवडला जातो. त्यामुळे फोटोग्राफरमधील आर्टिस्ट संपून गेला आहे. परिणामी जे फोटोग्राफर काळानुसार बदलले नाही ते मागेच राहून गेले, पर्यायाने त्यांचा व्यवसाय डबघाईला आला. (latest marathi news)

स्मार्ट फोनमुळे सगळेच फोटोग्राफर

घरगुती फंक्शनचे फोटो आता मोबाईलमध्ये काढले जातात. त्यासाठी फोटोग्राफरला बोलावून कॅमेऱ्यामध्ये फोटो काढण्याची पध्दत आता पूर्णपणे बंद झाली आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आल्याने काढलेले फोटो लगेच स्टेट्स, डीपी म्हणून ठेवले जातात. पूर्वीसारखी फोटो बघण्याची उत्सुकता आता राहिली नाही. वास्तविक फोटो काढण्याची कला ही केवळ व्यावसायिक फोटोग्राफरकडे असते.

तंत्रज्ञानाचा फायदा झाला पण..

एआय तंत्रज्ञान डिजिटल कॅमेऱ्यामुळे काम सोपी झाली. बॅकग्राउंड, फोटो कसाही असला तर तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाहिजे तसा फोटो डेव्हलप करता येतो. शिवाय लोकांना इन्स्टंटची सवय लागली आहे. आज २५ वर्षांपूर्वीचा अल्बम बघितला तरी तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. आता स्क्रीनवर इमेज बघायला मिळत असल्याने टच आणि फिल करण्याचा अनुभव राहिला नाही. फोटो बघण्याची उत्सुकता संपून क्षणिक आनंद घेण्याला महत्त्व आले.

"मॅटर्निटी शूट, बेबी शूट, प्री- वेडिंग अशा फोटोग्राफीला सर्वाधिक मागणी आहे. पण याचा खर्च सर्वांना परवडत नाही. फोटो स्टुडियो प्रकारही आता फार राहिला नाही. गेल्या ३५ वर्षापासून फोटोग्राफी क्षेत्रात काम करतो आहे. लग्नकार्यात लग्नाचा अल्बम, हार्ड कॉपीपेक्षा सॉफ्ट कॉपीची मागणी केली जाते. फोटो मोबाईल, लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याने हार्ड कॉपी, अल्बम प्रकार कमी झाला आहे परंतु, फोटोची प्रिंट हातात आल्यानंतर फोटोची खरी किंमत कळते." - किरण तांबट, व्यावसायिक फोटोग्राफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Health Tips :  शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा

'वक्फ बोर्डाच्या नावाखाली राज्यातील शांतता भंग केल्यास कठोर कारवाई करणार'; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

बॉक्सर Mike Tyson अन् जॅक पॉलवर कोटींचा वर्षाव; जाणून घ्या संपत्ती किती ?

Swiggy-Zomato: स्विगी, झोमॅटो आणि झेप्टोबाबत देशातील बड्या उद्योगपतीचा इशारा, म्हणाले, भारत हा...

SCROLL FOR NEXT