Nashik City esakal
नाशिक

Nashik Real Estate : महागड्या प्लॉटपेक्षा आपलं गावठाण बरं! जादा FSI, मध्यवर्ती भागामुळे पसंती

Nashik News : जादा एफएसआय व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर उपलब्ध होत असल्याची जोड गावठाणात घर बांधणीला प्रोत्साहित करत आहे.

दत्ता जाधव

Nashik Real Estate : कधीकाळी मर्यादित असलेली शहराची सीमारेषा महापालिकेच्या निर्मितीनंतर खेड्यापाड्यांपर्यत पोचली, त्यातच रिकाम्या प्लॉटच्या किमती गगनाला भिडल्याने महागडा प्लॉट घेऊन त्यावर बांधकाम करण्यापेक्षा अनेकांनी स्वतःच्या जागेत शहरातील मध्यवस्तीतच घरकुल उभारण्यास पसंती दिली असून जादा एफएसआय व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर उपलब्ध होत असल्याची जोड गावठाणात घर बांधणीला प्रोत्साहित करत आहे. (Nashik Real Estate people prefer hometown than expensive plot)

नव्वदच्या दशकापर्यंत शहरालगत मोकळा प्लॉट घेऊन त्यावर आपले टुमदार घरकुल उभारण्याकडे अनेकांचा कल होता. अर्थात तेव्हा रिकाम्या प्लॉटच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात होत्या. परंतु त्यानंतर गुंठेवारीची जागा स्क्वेअर मीटर, फुटांनी घेतल्याने सर्वसामन्यांना प्लॉट विकत घेऊन घरकुल बांधणे अशक्य झाले. कारण रिकाम्या प्लॉटसाठी मोठी रक्कम मोजल्यावर त्यावर घर कसे बांधायचे असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे कधीकाळी आडव्या पध्दतीने वाढणाऱ्या या शहराची वाढ उभ्या पध्दतीने होण्यास सुरवात झाली झाली.

शहर व परिसरात उंच उंच मनोरे उभे राहिले आहेत. शहरात अनेकांचे छोटे मोठे वाडे अस्तित्वात होते, शहराची वस्तीही मर्यादित असल्याने पूर्वी अनेक ठिकाणी घर भाड्याने दिले जायचे. यातच अनेकांच्या अनेक पिढ्या या भाडे तत्वावरील घरातच गेल्या.

परंतु गेल्या काही दिवसांत स्वत:चे घरकुल ही संकल्पना जोर धरू लागल्यावर प्लॉटच्या किमती गगनाला भिडल्या. त्यामुळे प्लॉट घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. यातीलच काहींनी मग शहरातील जुन्या घराच्या जागांवर स्वताचे घर किंवा इमारत उभाण्यावर भर दिला.

शहरातच उभ्या राहताहेत टुमदार इमारती

अनेकांनी जुने वाडे विकासकाकडे सोपवत जुन्या वाड्यांच्या जागी चार पाच मजली इमारती बांधण्याला पसंती दिली. यामुळे गावठाण भागातही उंच इमारती उभ्या राहू लागल्या. यातून उतार वयासाठी दोन पैसेही मिळत असल्याने अनेकांनी जुने वाडे विकासकडे सोपवत आहे. त्या जागेवरच फ्लॅटमध्ये राहण्यास पसंती दिली. त्यामुळे सद्या शहराच्या सर्वच भागात जुन्या वाड्यांच्या जागी उंच व देखण्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. (latest marathi news)

मुख्य समस्या पूररेषेची

शहरात आजवर आलेल्या तीन ते चार महापुरात शहराच्या अनेक उंच सखल भागात पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिकेने निळी व पिवळी पूररेषा निश्‍चित करत नदीपात्रालगतच्या बांधकामांना परवानगी नाकारली. मात्र याही स्थितीत काहींनी थेट पूररेषेत बांधकामे केली आहेत. तर अनेकांना पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास प्रतिबंध केला आहे. याबाबत धोरणात पारदर्शकता नसल्याचा आरोप बांधकामांना परवानगी न मिळालेल्यांनी केला आहे.

ज्येष्ठांची पसंती शहरालाच

सद्या नाशिकची सीमारेषा पूर्वेस आडगावच्या पलिकडे दक्षिणेस पांडवलेणी, पश्‍चिमेस सातपूरच्या पलिकडे तर उत्तरेस चामरलेणीच्या पलीकडे पोचली आहे. इतक्या दूरवरून शहरात नोकरी व्यवसाय करण्यापेक्षा मध्यवस्तीत फ्लॅट घेण्याकडेही अनेकांचा ओढा आहे.

ज्येष्ठांच्या अनेक पिढ्या शहराच्या मध्यवस्तीत गेल्याने त्यांचीही पसंती मध्यवस्तीतील फ्लॅटला मिळत आहे. त्यामुळे जुन्या वाड्यांच्या जागेवर टुमदार, देखण्या इमारती उभ्या राहात आहे. अनेक व्यावसायिकांनी शहरापासून दूर राहण्यापेक्षा तळ मजल्यावर व्यवसाय तर त्यावरील मजल्यावर राहण्यास अधिक पसंती दिली आहे.

"शहरातच इमारत बांधून स्थायिक होण्याकडील कल वाढत आहे. अशा पद्धतीने गावठाण भागाचाही विकास होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. यामुळे सद्या ज्वलंत विषय झालेल्या पार्किंगची समस्याही काही प्रमाणात सुटू शकते. यामुळे याचे स्वागतच व्हायला हवे."

- आर्कि. नीलेश चव्हाण, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कल्सल्टंट

"शहरापासून दूरवर प्लॉट घेऊन त्यावर बंगला बांधण्याऐवजी जुन्या नाशकातील राहत्या घराच्या जागेवरच घरकुल उभारले. त्यामुळे मूळच्या जागेवरच राहण्याचेही आनंद व समाधान मिळाले."

- विजय शिरसाट, रहिवासी, म्हसरूळ टेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT