India Book of Records and Asia Book of Records certificate examiner of Spelling B competition of Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal while accepting from Dr. Chitra Jain
India Book of Records and Asia Book of Records certificate examiner of Spelling B competition of Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal while accepting from Dr. Chitra Jain  esakal
नाशिक

Nashik ZP News : एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्हा परिषदेची नोंद!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात एकाच वेळी घेण्यात आलेल्या स्पेलिंग स्पर्धेत एकाच वेळी ११ हजार २२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सर्वाधिक विद्यार्थी सहभागासाठीचा विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केले आहे. (Record of Zilla Parishad in Asia and India Book of Records)

जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची दोन्ही रेकॉर्डसमध्ये नोंद घेण्यात आली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानपदक देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांत जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे शुक्रवारी (ता. २८) स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकराला एकाच वेळी झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील ११ हजार २२० विद्यार्थी सहभागी झाले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धत सहभाग घेतला. स्पेलिंग टेस्टची वेळ सकाळी अकरा ते दुपारी बारा अशी ठेवण्यात आली. यासाठी ५० शब्दांचे लेखन विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरसूचित करावयाचे होते. एका शब्दाचा उच्चार तीन वेळा करण्यात आला. लक्षपूर्वक ऐकून उत्तरसूचीत शब्द लेखन करण्यात आले. या स्पर्धेचे सर्व ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.

गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक तालुक्याच्या स्पर्धेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक डॉ. चित्रा जैन यांनी जिल्हा परिषदेने हा विक्रम केल्याची घोषणा करीत जिल्हा परिषदेला दोन्ही संस्थांकडून विक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानपदक देऊन सन्मानित केले. (latest marathi news)

आशिमा मित्तल, आदिवासी विकास आयुक्त डॉ. नयना गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी सोनिया नाकोडा यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.

एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌ने आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड ऑफ रेकॉर्डनुसार कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष जारी केले असून जिल्हा परिषद, नाशिक ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये प्रवेश करण्यास पात्र ठरली होती.

रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक तालुक्याच्या स्पर्धेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी मीता चौधरी, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, विस्तार अधिकारी संतोष झोले, नीलेश पाटोळे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. परवेज शेख यांनी सूत्रसंचालन केले.

"जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. मात्र, आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचा जागतिक दर्जाच्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच भारतातील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एकाच वेळी विक्रम प्रस्थापित करण्याची पहिली वेळ आहे. जिल्हा परिषद तसेच नाशिक जिल्ह्यासाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: गुंतवणूकदार मालामाल! शेअर बाजार विक्रमी उच्चांकाच्या जवळ बंद; कोणते शेअर्स वधारले?

Maharashtra Live News Updates : अंबादास दानवेंचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पुन्हा बैठक

Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी लावल्या रांगा; उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्रांसाठी धडपड

Sidharth Malhotra & Kiara Advani : कियाराने सिद्धार्थवर केली काळी जादू ? चाहतीकडून उकळले ५० लाख रुपये

SCROLL FOR NEXT