District Sessions Judge A present at the National People's Court. V. Gujarati, Senior Level Civil Judge A. L. Saraf, First Class Judicial Magistrate R. K. Purohit, First Class Magistrate S. P. Deshpande etc. esakal
नाशिक

Nashik Peoples Court : निफाडच्या लोकन्यायालयात साडेअकरा कोटींची वसुली! सामोपचारातून 947 प्रकरणांचा निपटारा

Nashik News : लोकन्यायालयातून वाद-तंटे मिटविणे हे पक्षकार, वकिलांसाठी वेळ, पैसा व श्रमाची बचत करणारे आहे, असे प्रतिपादन न्या. गुजराथी यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

निफाड : राष्ट्रीय लोक अदालतीनिमित्त निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात वाद-तंटे मिटवून ९४७ प्रकरणांतून सुमारे ११ कोटी ४३ लाख १२ हजार १४४ रुपयांची वसुली करण्यात आली. (Recovery of eleven half crores in People Court of Niphad)

लोकन्यायालयाचे औपचारिक उदघाटन निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायालयात वाढलेले खटले हे न्यायदानातील विलंबाचे एक कारण आहे. त्यामुळे लोकन्यायालयातून वाद-तंटे मिटविणे हे पक्षकार, वकिलांसाठी वेळ, पैसा व श्रमाची बचत करणारे आहे, असे प्रतिपादन न्या. गुजराथी यांनी केले. लोकन्यायालयात न्यायप्रविष्ट एकूण २७८२ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

त्यात २४३ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली. यातून १० कोटी ५५ लाख ४३ हजार ८८ रुपये वसूल करण्यात आले. न्यायालयात दाखलपूर्व ८०७६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७०४ प्रकरणांत तडजोड होऊन ८७ लाख ६९ हजार ५६ रुपये वसूल करण्यात आले. अशा एकूण ९४७ प्रकरणांमध्ये यशस्वीपणे तडजोड होऊन ११ कोटी ४३ लाख १२ हजार १४४ रुपये वसूल करण्यात आले. (latest marathi news)

लोकन्यायालयात निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एल. सराफ, निफाडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. पुरोहित, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण चार समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाज करण्यात आले. समिती सदस्य म्हणून ॲड. विनोद गुंजाळ, ॲड. निर्मला अरिगंळे, ॲड. रेखा सुरासे, ॲड. प्रभाकर केदार यांनी कामकाज पाहिले.

लोकन्यायालय यशस्वीतेसाठी निफाड वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण ठाकरे, सचिव ॲड. रामनाथ शिंदे, खजिनदार ॲड. केशव शिंदे, सदस्य ॲड. सुनील शेजवळ, ॲड. अमोल शिंदे, ॲड. वैशाली मोरे, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील ॲड. रमेश कापसे, निफाड जिल्हा न्यायालयाचे प्रभारी अधीक्षक किशोर जावरे, सहाय्यक अधीक्षक साळवे, पी. पी. दुसाने, वरिष्ठ लिपिक अभिजित कुलकर्णी, सचिन गडकरी आदींसह वकील, पक्षकार व निफाड न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT