Pavitra Portal Teacher Recruitment esakal
नाशिक

Nashik News: ‘पवित्र’ने भरला दुष्काळी तालुक्यांचा गुरुजींचा बॅकलॉग! नांदगावसह अन्य तालुक्यांत शाळांमध्ये 222 शिक्षकांची नियुक्ती

Nashik News : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यात २२२ शिक्षकांची पहिल्या टप्प्यात नियुक्ती झाली आहे.

संतोष विंचू

येवला‌ : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ११०० वर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यात २२२ शिक्षकांची पहिल्या टप्प्यात नियुक्ती झाली आहे. दुष्काळी तालुक्यांतच सर्वाधिक जागा रिक्त होत्या. या तालुक्याला ‘पवित्र’ने गुरुजी उपलब्ध करून दिले आहेत. (Nashik pavitra portal teacher recruitment marathi news)

राज्यात २० वर्षांत पहिल्यांदाच सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार आहेत. राज्यात २१ हजार ६७८ जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९, तर मुलाखतींसह चार हजार ८७९ पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसह महापालिका, पालिका व खासगी व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून शिफारस केली आहे.

यात नाशिक जिल्हा परिषदेलाही रिक्त जागांचा बॅकलॉग भरण्यास मोठा फायदा झाला आहे. जिल्हा परिषदेत शिक्षकांची ११ हजार २५१ पदे मंजूर असून, त्यापैकी १० हजार ६५ पदे भरली आहेत. १,१८६ रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेने आवश्यकतेनुसार जिल्ह्यात ३२० शिक्षकांच्या जागा भरण्याबाबत पवित्र पोर्टलद्वारे शासनाला कळविले होते. पहिल्या टप्प्यात २३० शिक्षक पदे भरली आहेत.

कागदपत्रांची पडताळणी पूर्ण

जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी (ता. ११) २२२ प्राथमिक शिक्षकांची समुपदेशनाद्वारे पदस्थापना झाली. पात्र उमेदवारांनी प्रक्रियेद्वारे कागदपत्रांची पडताळणी केली. मराठी माध्यमच्या १७०, इंग्लिश मीडियमसाठी चार, मॅथ-सायन्सच्या ४५. अशा २१९, तर तीन उमेदवारांनी उशीरा कागदपत्रे सादर केल्याने एकूण २२२ प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना झाली. यातील बहुतांश शिक्षक रूजू होण्यास रवाना झाले.

(Latest Marathi News)

नाशिकलगतच्या तालुक्यांना पसंती

प्राथमिक शिक्षकांची पसंती नाशिकलगतच्या तालुक्यांना असते. नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव व सिन्नर आदी तालुक्यांतच शिक्षकांची नियुक्ती झाल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला. अजूनही रिक्त जागांची संख्या मोठ्या संख्येने असल्याने त्या जागा भराव्यात, अशी अपेक्षा पालक व्यक्त करीत आहेत.

"जिल्ह्यात पवित्र पोर्टलद्वारे २२२ शिक्षकांच्या जागा भरल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. शिक्षकांच्या नियुक्तीमुळे सहाव्या राऊंडमधील बदली झालेल्या शिक्षकांना न्याय मिळाला, तसेच आंतरजिल्हा (स्वगृही) जाणाऱ्या शिक्षकांनाही प्रशासनाने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. विद्यार्थी व शाळाहिताच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे आभार. उर्वरित रिक्त शिक्षकांच्या जागाही लवकर भराव्यात."-प्रकाश अहिरे, जिल्हाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, नाशिक

तालुकानिहाय नियुक्त शिक्षकसंख्या

नांदगाव- ६९

येवला- ३६

चांदवड- २७

मालेगाव- ३७

बागलाण- १०

सिन्नर- २०

निफाड- १३

इगतपुरी- ७

दिंडोरी- २

देवळा- २

जिल्ह्यातील जि.प.च्या शाळा

देवळा- ११८

नाशिक- १०८

नांदगाव- २११

त्रंबकेश्वर- २४५

सिन्नर- २०९

पेठ- १८९

येवला- २३६

इगतपुरी- २२२

निफाड- २२४

बागलाण- २९७

चांदवड- १८०

सुरगाणा- ३१६

मालेगाव- २९७

दिंडोरी- २१२

कळवण- २०३

एकूण- ३२६७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT