Sanitary Pad sakal
नाशिक

Sanitary Pad : सॅनिटरी पॅड कचऱ्यात फेकताना ‘रेड मार्क’ करा; तज्ज्ञांचे मत

Nashik News : मासिक पाळीत शरीराची स्वच्छता राखणे जशी गरजेची असते, तशीच सॅनिटरी पॅडची व्यवस्थित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मासिक पाळीत शरीराची स्वच्छता राखणे जशी गरजेची असते, तशीच सॅनिटरी पॅडची व्यवस्थित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. शहरात महिला सॅनिटरी पॅड थेट कचरा कुंडीत किंवा उघड्यावर सर्रासपणे फेकतात. घंटागाडीत कचरा घेणारी माणसंच असतात म्हणून सॅनिटरी पॅड फेकताना कागदात गुंडाळून, पिशवीत रॅप करून त्यावर ‘रेड मार्क’ केल्यास कचरा जमा करणाऱ्या माणसांना वेगळा कचरा म्हणून त्याचा अंदाज येईल आणि त्याचे वर्गीकरण करणे सोयीचे ठरेल. (Red Mark on sanitary pads)

पुण्यात एका सामाजिक संस्थेने राबविलेला हा उपक्रम नाशिक शहरात राबविल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल. वास्तविक तज्ज्ञ डॉक्टर मेन्स्ट्रूअल कप किंवा पाच-सहा लेयर असणारा सुती कपडा मासिक पाळीत वापरण्याचा सल्ला देतात. कारण, सॅनिटरी पॅडमध्ये प्लास्टिकचा अंश असल्याने सहा तासांपेक्षा अधिक काळ पॅड वापरल्यास रॅश येऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते, त्यातून आजारपणाला निमंत्रण मिळते.

घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार महिला, तसेच विद्यार्थिनींना पॅड बदलण्यासाठी चांगली स्वच्छतागृहे उपलब्ध असतीलच, असे नसते. म्हणून त्यांच्यासाठी ही समस्या अधिकच गंभीर बनते. मासिक पाळीचे रक्त शुद्ध असले, तरी अधिक काळ पॅडवर राहिल्यास जंतू निर्माण होऊन संसर्ग होण्याची भीती वाढते.

याउलट आई मेन्स्ट्रूअल कप वापरत असेल, तर मुलीला समजावणे सोपे जाते. साधारण पाळीच्या सुरवातीचा तीन व अधिक दिवसांचा रक्तस्राव ५०-८० एमएल असतो आणि मेन्स्ट्रूअल कपची क्षमता ४० ते ५० एमएल एवढी असते. दिवसातून सहा ते दहा तासांत कप स्वच्छ धुवून परत वापरता येतो. (latest marathi news)

त्यासाठी फक्त बाटलीभर पाण्याची आवश्यकता भासते. मेन्स्ट्रूअल कप वापराबाबत समज-गैरसमज असल्याने ती वापरणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. पण, याबाबत जनजागृती झाल्यास शहरातील कचरा कमी होण्यास मदत होईल.

एक कप दहा वर्षे वापरण्याचा खर्च एक-तीन हजार, दहा वर्षांत सॅनिटरी पॅडचा खर्च ४५,००० समजा, शहरात १४ ते ४६ वयोगटातील चार लाख ३६ हजार महिलांची संख्या असेल, तर महिन्याला एका महिलेला १५ ते २० पॅड लागतात. त्यातून महिन्याला सहा हजार ७५० टन कचरा सॅनिटरी पॅडचा निर्माण होतो. एका पॅडचे वजन १० ग्रॅम असते. त्यातून ६५ हजार ४०० किलो कचरा प्रत्येक महिन्याला शहरात निर्माण होतो.

"वयात येणाऱ्या मुलींना नॉर्मल- ॲबनॉर्मल पाळी, पाळीतील स्वच्छता याचे शिक्षण देणे गरजेचे असते. सॅनिटरी पॅडपेक्षा मेन्स्ट्रूअल कप पर्यावरणपूरक असल्याने वापरण्यास सोयीस्कर आहे. आशा वर्कसच्या माध्यमातून आम्ही मेन्स्ट्रूअल कप कसा वापरावा, याचे प्रशिक्षण दिले. जेणेकरून त्या माहिती महिलांना देतील आणि महिला त्यांच्या मुलींना मार्गदर्शन करू शकतील. एकदा मेन्स्ट्रूअल कपची सवय झाली, की दुसरे काहीही वापरण्याची इच्छा होत नाही. त्यासाठी फक्त जनजागृतीची गरज आहे." - डॉ. कल्पना संकलेचा, स्त्रीरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT