Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : असहकार आंदोलन पत्राबाबत जि.प. प्रशासक अनभिज्ञ; ग्रामसेवक युनियनचे पत्र 3 दिवस उलटूनही प्रशासनापर्यंत पोचेना

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक कार्यमुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांतर्गत वाद उफाळून आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक कार्यमुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांतर्गत वाद उफाळून आला आहे. यात ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित प्रश्नांविरोधात येत्या शुक्रवार (ता. ७)पासून असहकार आंदोलन करण्याबाबतचे पत्र प्रशासक आशिमा मित्तल यांना दिले. (Regarding non cooperation protest letter ZP administration unaware)

मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना संबंधित आंदोलनाबाबतचे पत्र प्राप्त झालेले नसल्याचे समोर आले आहे. युनियनच्या आंदोलनाबाबतचे कोणतेही पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे मित्तल यांनी सोमवारी (ता. ३) स्पष्ट केले. त्यामुळे संघटनेने दिलेली आंदोलनाची हाक हे केवळ दबाबतंत्र, तर नव्हे ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात आठ वर्षांपासून पुनर्नियुक्तीवर काम करत असलेले ग्रामसेवक संजय बाविस्कर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने तडकाफडकी कार्यमुक्त केले होते. या प्रकारानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेंतर्गत राजकारण तापले. या कार्यमुक्तीवरून ग्रामसेवक युनियनमधील काही ग्रामसेवकांनी राजीनामा देत संघटनेबाहेर पडले.

यातच बाहेर पडलेल्या ग्रामसेवकांच्या गटाने महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेशी संलग्न असल्याचे पत्र मित्तल यांना दिले. असे असतानाही दुसरीकडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित प्रश्नांविरोधात ७ जूनपासून असहकार आंदोलन करण्याबाबतचे पत्र ३० मे २०२४ ला मित्तल यांना दिले. ग्रामसेवकांच्या प्रश्नांबाबत ग्रामपंचायत विभागप्रमुख यांची भूमिका उदासीन व नकारात्मक असल्याने ग्रामसेवकांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. (latest marathi news)

हे प्रलंबित प्रश्न सोडविले जात नसल्याने ७ जूनपासून असहकार आंदोलन करणार असल्याचे युनियनने दिलेल्या पत्रात नमूद म्हटले आहे. त्यावर संघटनेचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे, सरचिटणीस संजय गिरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनाबाबत प्रशासनाला विचारणा केली असताना संघटनेचे पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. मित्तल यांनीदेखील ग्रामसेवक युनियन संघटनेचे पत्र प्राप्त झालेले नसल्याचे सांगितले.

"जिल्ह्यातील ग्रामेसवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबतचे पत्र ३० मेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष हातात न देता टपालाद्वारे देण्यात आले आहे. याशिवाय सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत विभागासह सर्व विभागांना ते देण्यात आले आहे." - संजय गिरी, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन

ग्रामसेवकांच्या अंतर्गत वादाने प्रशासन वेठीला

जिल्ह्यातील ग्रामेसवक युनियनचा अंतर्गत वाद उफाळून आले असल्याचे चित्र आहे. संबंधित ग्रामसेवक बाविस्कर आठ वर्षांपासून ग्रामपंचायत विभागात कार्यरत होते. त्या वेळी त्यांच्या विरोधात तक्रारी नसल्याचे बोलले जात आहे. आता असे काही घडले आहे, की त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना कार्यमुक्तही केले आहे. असे असतानाही असहकार आंदोलनाची हाक नेमकी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामसेवकांच्या अंतर्गत वादात प्रशासनाला वेठीला धरले जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT