Auditor Raju Khairnar along with Additional Commissioner Rajendra Fatle etc. while presenting the budget to Municipal Commissioner Ravindra Jadhav. esakal
नाशिक

Nashik News : मालेगावकरांना दिलासा; घरपट्टी, पाणीपट्टीत वाढ नाही

Nashik : महापालिकेने कुठलीही प्रकारच्या घरपट्टी, पाणीपट्टी वाढ न करता सादर करण्यात आलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे ९८८ कोटी ८८ लाख रुपयाचे अंदाजपत्रकास आयुक्त रवींद्र जाधव यांनी शुक्रवारी (ता.१) मंजुरी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेने कुठलीही प्रकारच्या घरपट्टी, पाणीपट्टी वाढ न करता सादर करण्यात आलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे ९८८ कोटी ८८ लाख रुपयाचे अंदाजपत्रकास आयुक्त रवींद्र जाधव यांनी शुक्रवारी (ता.१) मंजुरी दिली. महापालिका सभागृहात झालेल्या विशेष महासभेत महापालिकेचे आजवरचे सर्वात मोठे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. (Nashik Relief for Malegaon residents marathi news)

लेखा विभाग व प्रशासनातर्फे लेखापरीक्षक राजू खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी २२ फेब्रुवारीला आयुक्तांना अंदाजपत्रक सादर केले होते. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी साडेसात कोटी रुपयाच्या उत्पन्नात वाढ दाखविली. विविध कामापोटी ९ कोटी ९० लाख रुपये खर्चवाढ केली. १९ लाख २६ हजार ५३३ रुपये शिल्लकीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.

यावेळी श्री. जाधव म्हणाले, लेखाधिकाऱ्यांकडून सादर केलेल्या अंदाजपत्रकात साडेसात कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. शहरातील मालमत्तांचे पुर्नमुल्यांकनापासून प्राप्त कर, मोबाईल टॉवर, ओएफसी केबल उत्पन्न, बाजार जागा भाडे, नवीन गाळे, दुकान पासून भाडे, मनपा जागांवर बीओटी तत्त्वावर विकास करणे, जुने सोडीयम लाइट बदलून एलईडी लावणे आदीतून हे उत्पन्न मिळणार आहे.

अंदाजपत्रकात २०२४-२५ मधील अपेक्षित महसुली उत्पन्न ४३३.२१ कोटी व अत्यावश्‍यक प्रमुख बाबींवरही अपेक्षित खर्च ३१०.५४ कोटी इतका असेल. महापालिका हद्दीत खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षणाचे काम होत असून झालेल्या सर्वेक्षणानुसार आगामी वर्षात घरपट्टीपासून अपेक्षित उत्पन्न शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त राहील असे गृहीत धरुन विविध कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. (latest marathi news)

पायाभूत सुविधा व अत्यावश्‍यक बाबींसाठी तरतूद करण्यात आली आहे. अमृत मलनिस्सारण प्रकल्पासाठी १४० कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. यात महापालिकेच्या हिस्स्याचे ६० कोटी रुपये तरतूद आहे. अमृत पाणीपुरवठा प्रकल्पासाठी राज्य व केंद्र शासनाकडून ५० कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.

शहरातील रस्त्यांसाठी महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत ७० कोटी रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासनाकडून ५० कोटी निधी अपेक्षित आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधणे व दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपये अनुदान प्राप्त होईल.

आर्थिक वर्षात वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प व कामे हाती घेण्याचा मानस असून अंदाजपत्रकात त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले. विशेष महासभेला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले, उपायुक्त हेमलता डगळे, लेखाधिकारी राजू खैरनार, नगरसचिव साजीद अन्सारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे

- नवीन मालमत्तांच्या उत्पन्नातून घरपट्टीचे उत्पन्न शंभर कोटीपेक्षा अधिक गृहित.

- महिला, बाल कल्याणकारी योजनांसाठी स्वतंत्र तरतूद

- महापालिका क्षेत्रातील मनपा मालकीच्या जागांचे संरक्षणाबाबत २५ लाखाची तरतुद

- प्रदुषण नियंत्रण मंडळाचे निर्देशनुसार शहरात कामांसाठी २० लाख रुपये.

- शहरात बीओटी तत्वावर नवीन प्रकल्प राबविण्यासाठी ५० लाख रुपये

- महापालिका क्षेत्रातील पार्किंगसाठी ४० लाख रुपये.

- मनपा मालकीचा इमारती, मोकळया जागेवर सौर उर्जा प्रकल्पासाठी २० लाख रुपये.

- स्वच्छ भारत अंतर्गत पाण्याची टाकीवर रंगकामासाठी २५ लाख रुपये.

- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी १ कोटी रुपये तरतुद करण्यात आली.

- संभाव्य नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी प्रत्येकी चार लाख.

- शहरातील नवीन उद्यान विकसीत करण्यासाठी १.३९ कोटी रुपये तरतूद.

- जुने सोडीयम लाईट बदलून नवीन एलईडी लावण्यासाठी २ कोटी रुपये.

- शहरातील विकास कामांसाठी ५० कोटींची तरतूद.

अंदाजपत्रक जमा रक्कम (लाखात)

जीएसटी अनुदान २२, ९०० (२३.१६ टक्के)

दर व कर ११, ३४४ (११.४७ टक्के)

मालमत्ता उपयोगिता महसूल ३०२२ (३.०६ टक्के)

जलदाय व्यवस्थेमुळे मिळालेल्या रकमा ३५४९ (३.५९) टक्के

अनुदाने अंशदाने ३३८ (०.३४ टक्के)

अनुदाने भांडवली जमा ४४, ६५३ (४५.१५ टक्के)

संकिर्ण २१६९ (२.१९ टक्के)

भाग-३ (असाधारण निलंबन लेखे) ६०८२ (६.१५ टक्के)

सुरवातीची शिल्लक ४८३३ (४.८९ टक्के)

एकूण जमा - ९८, ८८८ (१०० टक्के)

खर्च रक्कम (लाखात)

स.प्रा. वसुली खर्च ९७८३ (९.८९ टक्के)

सार्वत्रिक सुरक्षितता १५९४ (१.६१ टक्के)

आरोग्यसुविधा ११,११४ (११.२४ टक्के)

शिक्षण ५०७८ (५.१४ टक्के)

संकिर्ण व इतर ८९५ (०.९१ टक्के)

भांडवली खर्च ३०,१७२ (३०.५१ टक्के)

पाणी पुरवठा, ड्रेनेज ३६,७४० (३७.१५ टक्के)

असाधारण ऋण, निलंबन लेखे - ३४९३ (३.५३ टक्के)

अखेरची शिल्लक १९ (०.०२ टक्के)

एकूण खर्च - ९८, ८८८ (१०० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT