Short Circuit  esakal
नाशिक

Nashik Short Circuit : शॉर्टसर्किटमुळे आशर इस्टेटमधील रहिवाशांचे लाखोंचे नुकसान

Short Circuit : नाशिक- पुणे महामार्गावरील आशर इस्टेट येथे शॉर्टसर्किटमुळे गुरुव्हिला अपार्टमेंटमधील घरातील इलेक्ट्रिक उपकरण बंद पडून लाखोचे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Short Circuit : नाशिक- पुणे महामार्गावरील आशर इस्टेट येथे शॉर्टसर्किटमुळे गुरुव्हिला अपार्टमेंटमधील घरातील इलेक्ट्रिक उपकरण बंद पडून लाखोचे नुकसान झाले. महावितरणाकडून होणाऱ्या सततच्या अखंडित वीज पुरवठ्यामुळे महिनाभरात तीन वेळा असा प्रकार घडल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक मनस्ताप झालेला आहे. उपनगर सिग्नलवर असलेल्या आर्टिलरी सेंटरच्या गेटसमोर आशर इस्टेट आहे. (Residents of Asher Estate lost lakhs due to short circuit )

या इस्टेटमधील गुरुव्हिला अपार्टमेंटमध्ये महिनाभरापासून तीन वेळा शॉर्टसर्किटने टीव्ही, फ्रीज वॉशिंग मशीन, मोबाईल नादुरुस्त झाले आहे. महावितरणच्या उपनगर सबस्टेशन अंतर्गत सदर परिसर येतो. जेव्हा शॉर्टसर्किट झाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी व अधिकारी तेथे सर्व तपासणी करून गेले. त्यानंतर केबल नादुरुस्त आहे, असे सांगण्यात आले.

सोसायटीच्या रहिवाशांनी डीपी पासून ते बिल्डिंग पर्यंत केबल व अर्थिंग स्वखर्चाने करून घेतली. त्यानंतरही पुन्हा एकदा शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा खंडित झाला. सोसायटीतील रहिवासी यांनी खासगी इलेक्ट्रिशियन व महावितरणचे तंत्रज्ञ यांच्याकडूनही तपासणी सर्व करून घेतली. मात्र त्यावर कायमस्वरूपी अशी उपाययोजना होऊ शकलेली नाही.(latest marathi news)

नुकसानाचे काय ?

महावितरणाकडून वीज बिल अदा करण्याबाबत नियमितपणे जनजागृती केली जात असते. मात्र गुरुव्हिला सोसायटीतील रहिवासी यांचे झालेल्या आर्थिक नुकसान याबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही.

''गेल्या महिन्याभरापासून आम्ही वारंवार होणाऱ्या शॉर्टसर्किटमुळे त्रस्त आहोत. आमच्या सोसायटीतील अनेकांचं विद्युत उपकरणे खराब झाली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. केबल व अर्थिंग आम्ही स्वखर्चाने करून घेतली मात्र तरीही समस्या कायम आहे.''- दिलीप दिघे, चेअरमन

गुरुव्हिला सोसायटी

''मी स्वतः व कर्मचारी यांनी तीन वेळा प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली. गुरुव्हिला सोसायटीतील वीज प्रवाह दुसऱ्या फेज मार्फत सुरू करून दिलेला आहे. नव्याने बसवण्यात आलेल्या केबलमधून सप्लाय रिटर्न येत आहे. काल मर्यादेनुसार काही वायरिंग कमकुवत होऊ शकतात. सोसायटीत पुन्हा अशी समस्या निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्नशील आहोत.''- मंगेश नागरे, सहाय्यक अभियंता उपनगर सब स्टेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात घसरण कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Latest Marathi News Updates live : नवाब मलिक यांच्या जावयाच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्यात वाढ

Kolhapur Elections : दक्षिण, उत्तर, इचलकरंजी, कागल, शाहूवाडीत दुरंगी लढती; राधानगरी, चंदगडमध्ये बंडखोर जोरात

Nagpur Crime: मृतदेहाला केमिकल लावण्यासाठी मागितले पैसे; नागपूरध्ये धक्कादायक प्रकार

Eknath Shinde: आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? होऊन जाऊ द्या "दूध का दूध पानी का पानी"

SCROLL FOR NEXT