CBSE Board Result esakal
नाशिक

CBSE Board Result : सीबीएसई दहावीच्‍या निकालात चमकले विद्यार्थी! शहरातील विविध शाळांचे उज्‍ज्‍वल यश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्‍यातर्फे घेतलेल्‍या इयत्ता दहावीच्‍या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.१३) दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत शहर परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांवर शुभेच्‍छांचा वर्षाव सुरु होता. सीबीएसई बोर्डाच्‍या दहावीच्‍या परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. (Result of Central Board of Secondary Education announced)

विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या लॉगइनच्‍या साहाय्याने निकाल पाहाण्यासाठी उपलब्‍ध करून दिला होता. परंतु शाळांना एकत्रितरीत्या निकाल उपलब्‍ध होण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्‍या. त्‍यामुळे अनेक शाळांमध्ये निकालाच्‍या विश्‍लेषणाचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु राहिले. दरम्‍यान दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक शाळांनी शंभर टक्‍के निकालाची नोंद केली आहे.

दिल्‍ली पब्लिक स्‍कूलमध्ये आर्याचा अव्वल क्रमांक

दिल्ली पब्लिक स्कूलने यंदाही जोरदार यश मिळविले असून, दहावीच्‍या परीक्षेत ९८.८३ टक्के गुण मिळवीत आर्या दुबे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर यशश्री कुलकर्णी (९८.३३ टक्के) द्वितीय आणि रीती मालपाणी (९८ टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया यांनी केले आहे.

सिम्‍बॉयसिस स्‍कूलचा शंभर टक्‍के निकाल

सिम्‍बॉयसिस स्‍कूलचा निकाल शंभर टक्‍के लागला असून, सर्व १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यापैकी ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्‍यांहून अधिक गुण मिळविले. शाळेतून राजस कुसुरकर याने ९७ टक्‍के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. शांभवी सोनवणे (९६ टक्‍के) द्वितीय आणि अर्णव जोशी, अद्वय पाठक आणि सोहम पाटील यांनी ९५.६० टक्‍के गुण मिळविताना संयुक्‍तरित्‍या तृतीय क्रमांक पटकावला आहे. (latest marathi news)

रासबिहारी स्‍कूलमधून शुभम, पर्णवी अव्वल

रासबिहारी इंटरशनॅशनल स्‍कूलमधून शुभम पाडवी आणि पर्णवी जावळकर (९४ टक्‍के) गुणांसह संयुक्‍तरित्‍या प्रथम क्रमांक पटकावला. तर स्‍वयम शिंदे (९१.८ टक्‍के) द्वितीय, समीक्षा बर्वे (९०.८ टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेने शंभर टक्‍के निकालाची नोंद केली आहे.

नाशिक रोड कॅम्प केंद्रीय विद्यालयाचा निकाल ९७.६९ टक्‍के

पीएमश्री नाशिक रोड कॅम्प केंद्रीय विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.६९ टक्‍के लागला आहे. शाळेतून स्वरा कोठावडे हिने ९७.४ टक्‍के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ओम पगार याने ९६.४ टक्क्‍यांसह द्वितीय आणि श्रुती मौर्य हिने ९५.६ टक्क्‍यांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत, उपप्राचार्या अंजु कृष्णानी, निमिषा सिंह आदींनी अभिनंदन केले.

श्रीचैतन्‍य टेक्‍नोस्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांचे यश

श्रीचैतन्‍य टेक्‍नोस्‍कूलमधून तनिष्क गटफने (९६.४ टक्‍के) प्रथम, रोशन माळी (९५.२० टक्‍के) द्वितीय आणि प्रज्‍वल शेळके (९४.६ टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT