पिंपळगांव बसवंत : सध्या परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत, मात्र याच पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. सलग चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह धो- धो कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यात दाणादाण उडविली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकाला बसत असून द्राक्ष बागाची ऐन भरात आलेली फळधारणा छाटणी अन् सोयाबीनच्या काढणीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. धुव्वाधार पावसाने पिंपळगाव शहरातील रस्त्याची वाट लावली आहे. (return of rains has spoiled pruning of fruit bearing grapes in Niphad taluka)
महामार्गावर आधीच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना पावसाच्या पाण्याने वाहनधारक व नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे. यंदा शेतकऱ्यांना पावसाचा सतत सामना करावा लागतो आहे. निफाड तालुक्याची ५०० मिलिमीटर पावसाने सरासरी कधीच ओलांडली आहे. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने नदी, नाले, कालवे तुडुंब भरून वाहत आहेत. दररोज शेतामध्ये पाणी साचत असल्यामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. २४ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे पीक काढणीला आले आहे. (latest marathi news)
पाऊस उसंत घेत नसल्याने उभे पिके आडवी झाली आहेत. द्राक्ष बागांसाठी महत्त्वाची असलेल्या फळधारणा छाटणीला पावसाने खोडा घातला आहे. छाटणीचे नियोजन बिघडते आहे. चार दिवसांपासून पिंपळगाव शहराला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे.दुपारी किंवा सायंकाळी असा धडाका पावसाने लावला आहे. सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे जनजीवन विस्कळित होत आहे. उपनगरातील रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचत आहे, त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.