Devla Nagar Panchayat esakal
नाशिक

Nashik News : देवळा नगरपंचायतीतर्फे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन

Nashik News : देवळा नगरपंचायत हद्दीतील सर्व करपात्र मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून तशी करआकारणी प्रस्तावित केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देवळा नगरपंचायत हद्दीतील सर्व करपात्र मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून तशी करआकारणी प्रस्तावित केली आहे. या करआकारणीबाबत मालमत्ता कर धारकांना काही आक्षेप असतील तर ते त्यांनी १० जुलैपर्यंत नोंदविण्याचे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी देवळा शहरातील निवासी. (Revaluation of properties by Devla Nagar Panchayat)

बिगर निवासी तसेच खुले भूखंड मालमत्तांवर भांडवली मूल्यांवर आधारित करपात्र क्षेत्रफळाच्या पार्श्वभूमीवर प्रारूप कर निर्धारण यादी यापूर्वीच तयार करण्यात आली आहे. यादी प्राधिकृत मूल्यनिर्धारित अधिकारी यांच्याकडून तपासून घेण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी काढलेल्या पंचवार्षिक करमूल्यांकन विशेष नोटिशीनुसार.

११ जून २०२४ पासून तीन दिवसांच्या आत या यादीतील कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात हरकत असल्यास अशा मालमत्तांचे मालक, भोगवटादार व अभिकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्या नावे लेखी हरकती सादर करावी लागणार आहे. नगरपंचायतीच्या कार्यालयातील कर विभागात करआकारणी संबंधातील यादीत अभिलेख पाहण्यास व लेखी आक्षेप नोंदवण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

१० जुलै २०२४ पर्यंत लेखी हरकत आक्षेपाच्या तपशीलासह स्पष्ट स्वरूपात दाखल न केल्यास प्रस्तावित कर आकारणी आपणास मान्य आहे असे समजण्यात येईल असेही या नोटिशीत शेवटी म्हटले आहे. मालकीचे तसेच भोगवटधाराचे मालमत्तेच्या करपात्र क्षेत्राचे मूल्यनिर्धारण तपशील निश्चित करत तसे कळवले जात आहे. (latest marathi news)

हरकतीसाठी अभिलेख

हरकत किंवा आक्षेप अर्ज, ११९ चे नोटीस पत्र, मालकी हक्का संबंधित अभिलेख, मागील वर्षाच्या कर भरलेल्या देयकाची प्रत, बांधकाम परवानगी बांधकाम पूर्णत्वचा दाखला, वापर परवाना, आधार कार्ड, मोबाईल नंबर, भाडेकरू असल्यास भाडे करारनामा तसेच संबंधित आवश्यक कागदपत्रे

"पंचवार्षिक कर मूल्यांकन हे शासनाच्या निकषानुसार व मालमत्तेच्या प्रकार, मालमत्तेचे क्षेत्रफळानुसार, वापरकर्ता प्रवर्ग म्हणजे निवासी, वाणिज्य मिश्र, इमारतीच्या वयानुसार निर्धारित करण्यात आले आहे. याबाबत कुणाची काही शंका वा हरकत असेल तर तसा नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा आणि दुसरे म्हणजे सदरची आकारणी ही मालमत्तेच्या भोगावट्याशी , वापराशी संबंधित असल्याने कोणतीही अतिक्रमित वा अनधिकृत मालमत्ता अधिकृत होत नाही." - प्रमोद ढोरजकर (मुख्याधिकारी देवळा नगरपंचायत)

"नगरपंचायतीने वार्षिक कर मूल्यांकन सूचना नोटिशीद्वारे कळवण्यात आले असले तरी यामध्ये मालमत्ता करात मोठी वाढ सुचवण्यात आली आहे. हरकतीच्या माध्यमातून आम्ही ते दाखवून देऊ." - पी.के.आहेर ज्ञानेश्वरनगर देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT