stamp duty esakal
नाशिक

Nashik News : मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरी मालामाल! शासनाला एका वर्षात तब्बल 50 हजार 500 कोटी रुपयांचा महसूल

Nashik : वर्षात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून शासनाला एका वर्षात तब्बल ५० हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे.

प्रशांत बैरागी -सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शासनाला आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे महसूल, गौण खनिज, दारूबंदी, यांसारखे अनेक खाते असले तरी गेल्या आर्थिक वर्षात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून शासनाला एका वर्षात तब्बल ५० हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असला तरी गुंतवणुकीसाठी नागरिक घर, जमीन खरेदीला अग्रक्रम देत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे. (Nashik revenue of 50 thousand 500 crore rupees to government )

नागरिकांना गुंतवणुकीसाठी बँक, पोस्ट, सोने खरेदी, शेअर मार्केट, एसआयपी यांसारखे अनेक पर्याय असले तरी जमीन आणि सदनिका खरेदीकडे नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे महागाईच्या नावाने ओरड होत असली तरी नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावल्याने राज्यातील नागरिकांनी मालमत्ता खरेदी-विक्रीला अग्रक्रम दिल्याचे समोर आले आहे.

वस्तू व सेवा करानंतर राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, ऑनलाइन भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. राज्यामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर सदनिका खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे संपलेल्या आर्थिक वर्षात २८ लाख २६ हजार १५० दस्तांची नोंदणी होऊन तब्बल ५० हजार ५०० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. विभागाला सुरवातीला ४५ हजार कोटी आणि त्यानंतर वाढीव ५० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यश मिळाले आहे.  (latest marathi news)

''राज्य शासनाकडून दर वर्षी नोंदणी व मुद्रांक विभागाला महसूलाचे उद्दिष्ट दिले जाते. २०२३-२४ या वर्षासाठी शासनाने विभागाला ५० हजार कोटींचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल गोळा झाला आहे.''- हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरीक्षक

माहेवार दस्तसंख्या मिळालेला महसूल असा

महिना दस्तसंख्या महसूल

एप्रिल २,२४,६७३ २८७५.८०

मे २,२०,७३५ ३४३९.६२

जून २,५१,६९९ ३८०४.६९

जुलै २,२९,११७ ३९२१.६३

ऑगस्ट २,३७,४६९ ४०५६.४६

सप्टेंबर २,१०,२५६ ४३७६.९६

ऑक्टोबर २,२६,०५६ ३७९७.६१

नोव्हेंबर २,१२,१८९ ३७३१.७८

डिसेंबर २,१०,००२ ३९८२.२२

जानेवारी २,४७,९१२ ४१५६.४७

फेब्रुवारी २,६७,५३० ४४३५.९०

मार्च १,९१,६२६ ७९२१

एकूण दस्तसंख्या : २८ लाख २६ हजार १५०

शासनाला मिळालेला महसूल : ५० हजार ५०० कोटी रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT