Narrow bridge near Wakhari village on Nandgaon-Malegaon road. In the second photo, the narrow bridge over the Panzhan River near the Nagya-Sakya Dam esakal
नाशिक

Nashik Road Damage: कौळाणे-नांदगाव रस्त्याची 2 वर्षात दुरवस्था; अरुंद मोऱ्या देताहेत अपघाताला निमंत्रण

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काटेरी झुडपांनी अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : कौळाणे-नांदगाव-येवला या एकशेवीस कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या ‘हायब्रीड ॲन्युईटी’ रस्त्याची दोन वर्षात वाट लागली.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काटेरी झुडपांनी अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. (Nashik Road Damage Kaulane Nandgaon road in bad condition in 2 years Narrow lanes invite accidents)

‘हायब्रीड ॲन्युईटी’ अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण कामासोबत १२१ मोऱ्यांचे (छोटे पूल) काम प्रस्तावित होते. त्यातील ३३ ते ३४ ठिकाणच्या मोऱ्यांचे काम झाले. काहींचे काम अंदाजपत्रकीय तरतुदीसाठी खोळंबून राहिले.

शिवाय रस्ता एकूण बारा मीटर रुंदीचा असणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी त्यात घट होऊन नऊ मीटर रुंदी राहिली. मात्र, रस्त्याच्या प्रशासकीय मंजुरी व त्यानंतर निघालेल्या अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे ‘स्टॅण्डर्ड’ मापदंडात हवे तसे बदल होत गेले.

त्याचा व्हायचा तो परिणाम सध्या वळविण्यात आलेल्या अतिरिक्त वाहतुकीच्या वर्दळीत दिसून येत आहे. समोरासमोर येणाऱ्या वाहनधारकांनी सतर्कता बाळगली नाही, तर अपघाताला निमंत्रण मिळते.

आता रस्त्यावर ज्या ठिकाणी अरुंद मोऱ्यांसह रस्ता अरुंद होतो, त्याठिकाणी दिशादर्शक फलक, रेडिमेड लावलेले ड्रम अथवा गतिरोधक सदृश पांढरे पट्टे असणे गरजेचे बनले आहे. मालेगाव व येवला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना केली नाही.

अपघातामध्ये ठार

नांदगाव-मालेगाव दरम्यान अरुंद पुलावर अपघात होऊन जीवितहानी होण्यासह गंभीर जखमी होण्याच्या घटनाक्रमामुळे रस्त्यावरील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून त्यांचे निराकरण करण्याची आवश्‍यकता आहे.

निसर्ग हॉटेलजवळील मोरीचे रुंदीकरण न झाल्याने इथे एका मासे विक्रेत्याला अवजड वाहन जवळून जाताना अरुंद मोरीचा अंदाज न आल्याने तो दुचाकीस्वार अपघातात ठार झाला.

नाग्या-साक्या धरणाजवळील पांझण नदीवरील पूल अरुंद असल्याने कारचा अपघात होऊन मालेगावच्या डॉक्टरांचा आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता.

हिंगणवाडी गावाजवळील नाल्यावरील अरुंद पूल, नाग्या-साक्या धरणाजवळील पांझण नदीवरील अरुंद पूल, पंचमुखी हनुमानजवळील नाल्यावरील मोरी, वाखारी गावाजवळील नदीवरील पूल, जाटपाडे गावाजवळील वळणावरील पूल, निमगाव नदीवरील पूल आदींसह इतर नाल्यावरील पूल आणि मोऱ्यांची रुंदी वाढविणे आवश्‍यक बनले आहे.

अन्यथा रात्रीच्यावेळी अथवा दिवसा अरुंद पुलांचा अथवा मोरींचा अंदाज न आल्यास अपघात होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT