Digging pits with the help of JCB on the road coming out of Girna river basin. esakal
नाशिक

Illegal Sand Mining : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी रस्त्यावर खड्डे; प्रशासनाकडून कारवाई

Nashik News : तालुक्यातील लोहणेर-ठेंगोडा गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर महसूल आणि पोलिस प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील लोहणेर-ठेंगोडा गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर महसूल आणि पोलिस प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या होणारी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी देवळा तालुका महसूल प्रशासनाने गिरणानदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यांवर जेसीबीच्या साहाय्याने ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे खोदून अटकाव केला आहे. (Illegal Sand Mining)

गिरणा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा होत असल्याचे वृत्त दैनिक 'सकाळ' ने प्रसिद्ध करत याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर हा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित करण्यात आले असून या पथकांच्या माध्यमातून अवैध वाळू उपशाला अंकुश लावला जाणार आहे.

तसेच गिरणा नदीपात्रात जाण्यासाठी वाळूमाफिया ज्या मार्गांचा वापर करतात, त्या रस्त्यांवर महसूल प्रशासनाच्यावतीने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर मोठया चाऱ्या खोदत हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. (latest marathi news)

खड्डे बुजविणाऱ्यांवर कारवाई

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी देवळा प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे करत वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात आला. जर वाळू माफियांनी हे रस्ते बुजवल्यास अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितांतर्गत गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे. यामुळे रात्री-बेरात्री होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल अशी नागरिक व्यक्त करत आहे.

"अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने वाळू वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर खड्डे खोदले आहे. यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांवर अंकुश बसेल. जर हे खड्डे कुणी बुजविले त्यावर कारवाई करण्यात येईल." - डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT