railway track esakal
नाशिक

Nashik News : नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर रेल्वेमार्ग व्हावा; कुंभमेळा निधीत तरतुदीची अपेक्षा

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : जगात त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व असताना नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यान रेल्वे अथवा मेट्रोमार्ग व्हायला हवा. यासाठी केंद्र सरकारने कुंभमेळ्याच्या निधीत रेल्वेमार्गासाठी वेगळी तरतूद करायला हवी, अशी मागणी पुढे येत आहे. येत्या कुंभमेळ्यात तरतूद करून २०२६ पर्यंत हा रेल्वे/मेट्रोमार्ग सहज शक्य असल्याचे नाशिकमधील जाणकारांनी सांगितले. (Nashik Road to Trimbakeshwar Railway Expectation of provision in Kumbh Mela fund Nashik Latest Marathi News)

कुंभमेळ्याव्यतिरिक्त नेहमीच धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये देशभरातून पर्यटक येत असतात. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर उतरल्यावर त्यांना तेथून सीबीएस आणि तेथून बसने त्र्यंबकेश्‍वरला यावे लागते. यात वेळ, पैसा खर्च होतो, म्हणून नाशिक रोडपासून कनेक्टिव्हिटी असणारा रेल्वेमार्ग त्र्यंबकेश्वरपर्यंत केल्यास वैविध्यपूर्ण गोष्टींना चालना मिळणार आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच त्र्यंबकेश्वरच्या अर्थकारणाला गती येईल.

या भागातील काही माळरान जमिनी उद्योगांसाठी उपलब्ध होऊ शकतील. आयटी हबसाठीही चालना मिळू शकेल. त्र्यंबकेश्‍वरवरून हा रेल्वेमार्ग पुढे पश्‍चिम रेल्वेलाही जोडला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक अर्थाने नाशिकच्या विकासाला हातभार लागू शकतो. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निधीत रेल्वेमार्गासाठी वेगळी तरतूद असायला हवी, अशी मागणी होत आहे.

वेदपाठ शाळेबरोबरच त्र्यंबकेश्वरला अनेक निसर्गोपचार केंद्रे स्थापन होत आहेत. त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांना आपला माल नाशिक रोड अथवा अन्य बाजारपेठांमध्ये आणण्यासाठी मेट्रो अथवा रेल्वेचा उपयोग होऊ शकतो. शिक्षण, शेती, सहकार, आरोग्य, धार्मिक पर्यटन यांना चालना मिळू शकते. शिवाय सातपूरसारख्या औद्योगिक वसाहतीलाही रेल्वेचा फायदा होणार आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

कुंभमेळा निधीमध्ये नाशिक ते त्र्यंबक कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वे अथवा मेट्रोची तरतूद करायला हवी. यामुळे पर्यटनाला प्रवास सुकर होईलच, शिवाय कायमस्वरूपी शाश्वत प्रवासाची साधने वृद्धिंगत होतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने नाशिक-त्र्यंबक कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न करावे आणि कुंभमेळ्याच्या निधीमध्ये रेल्वेमार्गासाठी वेगळी तरतूद असावी, असे सांगितले जात आहे.

"नाशिक, नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर कनेक्टिव्हिटी वाढणे काळाची गरज आहे. यामुळे पर्यटनाबरोबरच नाशिकचा महसूल वाढेल. शिक्षण, कृषी आयुर्वेदाला चालना मिळून नाशिक आयुर्वेद हब होण्यासाठी मेट्रो अथवा रेल्वेचा नक्कीच सहयोग राहील. केंद्राने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा." -संजय खालकर, नाशिक

"नाशिक रोड रेल्वेस्थानकापासून त्र्यंबकेश्वरला रेल्वेमार्ग व्हायला हवा. यामुळे पर्यटकांना त्र्यंबकेश्वरला पोचणे सोयीचे होणार आहे. शिवाय नाशिकच्या लोकांचा रोजगार वाढेल, प्रवास सुकर होईल आणि नाशिकच्या व्यवसायालाही भरभराटी मिळू शकते."

-संजय कल्याणी, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT