After Malegaon, the mercury in Nashik has also started to move towards forty, so all the roads in the city have become deserted after eleven in the morning. esakal
नाशिक

Summer Heat : उन्हाच्या झळांनी अकरानंतर रस्ते निर्मनुष्य; पारा चाळीशीकडे

सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : मालेगाव पाठोपाठ नाशिकचा पाराही चाळीशीकडे सरकू लागल्याने शहरातील सर्वच रस्ते सकाळी अकरानंतर निर्मनुष्य होऊ लागले आहेत. उन्हाच्या चटक्याच्या भीतीने अनेक दुचाकीस्वार सिंग्नलवर न थांबता परिसरातील झाडांचा किंवा दुकानांच्या आसऱ्याने दुचाकी थांबवतात किंवा लाल दिवा असूनही सुसाट सुटत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (nashik Roads are deserted after eleven due to heat of summer marathi news)

कधीकाळी चार- पाच किलोमीटर परिघात सीमित असलेले नाशिक आज पांडव लेणी, चामर लेण्यांच्या पलिकडे सरकून महानगर झाले आहे. शहराची लोकसंख्याही पंचवीस लाखांच्या आसपास पोचली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पूर्वी मोठ्या प्रमाणावर असलेली वृक्षवल्ली कमी झाली असून सिमेंट व डांबरीकरण वाढले आहे. त्यामुळे शहर सोडाच परिसरातही मातीचा रस्ता शोधावा लागतो. याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे.

महानगराची सीमा सोडाच त्याही पलिकडे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सिमेंटची जंगले उभी राहू लागली. शहर परिसरातील शेतीची जागा उंचउंच टॉवरने घेतली आहे. सहाजिकच शहराची थंड हवेचे ठिकाण ही ओळख येत्या काळात उष्ण हवेचे ठिकाण या नव्या ओळखीने घेतली आहे. याचा परिणाम मेनरोड सारख्या बाजारपेठेवरही जाणवू लागला आहे. (latest marathi news)

दुपारी बारानंतर एरवी प्रचंड गर्दी असलेल्या मेनरोड, शालिमार रविवार पेठ या बाजारपेठेतही जाणवू लागल्याचे या भागातील व्यावसायिकांनी सांगितले. वाढत्या तापमानामुळे दुपारनंतर सिंग्नलवरील लाल दिवा चालू असलातरी अनेकजण सुसाट सुटत असल्याचे चित्र आहे. कायद्याचा धाक असलेले काहीजण मात्र तीव्र उन्हात थांबण्यापेक्षा जवळपासच्या झाडाच्या सावलीचा आसरा शोधत असल्याचे दिसून येते.

गोदाघाटावर स्नानासाठी गर्दी

सकाळी सात आठपासून प्रचंड उकाड्याला सुरवात होते, त्यामुळे अगदी डिसेंबरअखेर सुखद गारवा अनुभवणाऱ्यांना हेच का थंड हवेचे शहर असा प्रश्‍न पडतो. उन्हाच्या काहिलीपासून बचावासाठी दुपारनंतर गांधी तलाव, रामतीर्थ, दुतोंड्या मारुती कुंड आदी भागात स्नानासाठी मोठी गर्दी उसळतेय. यात तरुणाईबरोबच चिमुरड्यांचा सहभाग वाढतो आहे.

उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करण्यासाठी अनेकांनी उसाचा रस, ज्यूस, लिंबू सरबत आदींना पसंती दिली आहे. त्यात अनेकांची पसंती आरोग्याला अपायकारक नसलेल्या उसाच्या ताज्या रसाबरोबरच लिंबू सरबत, मठ्ठा, कोकम सरबत यांना मिळत आहे. वाढत्या तापमानाने रसवंत्यांमध्येही गर्दी उसळू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT