Traffic jam on Ashok stambh to Mehre Signal road. esakal
नाशिक

Nashik Rain Update : रिमझिम पावसाने रस्त्यांची चाळण! बेशिस्त पार्किंगमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

Nashik News : शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत रस्त्यालगत करण्यात आलेल्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : शहर परिसरात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने नाशिककरांना दिलासा दिला असला तरी, शहरातील रस्त्यांची मात्र खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. तर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत रस्त्यालगत करण्यात आलेल्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी झाली होती. (Nashik roads wet with rain in city)

नाशिक शहराला यंदा पावसाने चांगली ओढ दिली. तब्बल पावणे दोन महिन्यांच्या उसंतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. जोरदार पाऊस नसला तरी रिमझिम पावसानेही शहरातील रस्त्याची मात्र चाळण केली आहे. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक खोळंबून रहदारी संथगतीने सुरू होती.

त्र्यंबकरोडवरील सिबल चौकात तर अक्षरश: वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते आहे. अशी परिस्थिती खडकाळी सिग्नलवर झाली आहे. अनेक चौकांमध्ये पावसाचे पाणी थुंबून पादचाऱ्यांना त्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती.

एकीकडे पावसाने रस्त्याची चाळण केली असता, दुसरीकडे रस्त्यावर चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय वाढली. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत वाहनांची अनधिकृत पार्किंग वाढली होती. एम.जी. रोडच्या दुतर्फा दुकानांसमोर दुचाक्या-चारचाकी वाहनांची पार्किंग असताना पुन्हा त्यालगत चारचाकी वाहनांची अनधिकृत पार्किंग असल्याने रहदारीसाठी रस्ता अरुंद झाला होता. (latest marathi news)

परिणामी त्यातून वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली होती. हीच स्थिती स्मार्ट रोडवरील सीबीएस सिग्नल ते अशोकस्तंभ या दरम्यान झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतरित्या चारचाकी वाहनांची पार्किंग केल्याने शहर बसेस, चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत होती. यातून लहानसहान अपघाताच्या घडना घडून वादावादीचेही प्रसंग झडले.

वाहतूक शाखेचे दूर्लक्ष

एमजी रोड, शालिमार, स्मार्ट रोड या परिसरात शहर वाहतूक पोलीस शाखेचे टोईंग वाहन फिरत होते. परंतु ते केवळ दुचाक्या वाहनांची टोईंग करीत होते. परंतु अनधिकृतरित्या पार्क केलेल्या चारचाकी वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. काही त्रस्त वाहनचालकांनी वाहतुकीला अडथळा ठरू पाहणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना सूचविले परंतु त्यांनी त्याकडे दूर्लक्ष करणेच सोयीस्कररित्या दाखविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT