A vegetable market lining Peth Road. esakal
नाशिक

Nashik News : मखमलाबाद रोडवर रस्त्यालगतच्या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा

Nashik News : मखमलाबाद गाव ते मखमलाबाद नाका, मखमलाबाद- म्हसरूळ लिंक रोड या दोन मुख्य रस्त्यांच्या कडेला भाजी तसेच मटण- मच्छी बाजार भरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : महापालिकेकडून भाजी विक्रेत्यांसाठी काही ठिकाणी खास जागा उपलब्ध केली असली तरी, विक्रेत्यांच्या थेट रस्त्यावरच भाजीबाजार मांडण्याच्या अट्टहासाने वाहतूक कोंडीसह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. मखमलाबाद रोडवर भाजी व मच्छी बाजार अशाच प्रकारे भरत आहे. विक्रेत्यांकडे भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्याने येणाऱ्या वाहनांना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. (Nashik Roadside market on Makhmalabad Road obstruct traffic marathi news)

मखमलाबाद गाव ते मखमलाबाद नाका, मखमलाबाद- म्हसरूळ लिंक रोड या दोन मुख्य रस्त्यांच्या कडेला भाजी तसेच मटण- मच्छी बाजार भरत आहे. हे बाजार थेट रस्त्याच्या कडेलाच भरविले जातात. मखमलाबाद परिसरातील शांतिनगर, शिंदेनगर, मानकरनगर, गुलमोहरनगर या परिसरातील रस्त्यांचे भाग बाजाराच्या वेळी विक्रेत्यांनी व्यापले आहेत.

बाजारासाठी मोकळ्या आणि रस्त्यापासून काहीशा अंतरावर व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यानुसार काही भागात अशी व्यवस्था असतानाही विक्रेते थेट रस्त्यावरच भाजीपाल्याचे दुकाने मांडत आहेत. हे चित्र पंचवटी परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या कडेला दिसते.

रस्त्यावरून जाणारे ग्राहक थांबून आपल्या भाजीपाला खरेदी करतील, या उद्देशाने रस्त्यावरच भाजीपाला मांडून विक्री करण्यावर अनेक विक्रेत्यांचा कल असतो. त्यामुळेच असे बाजार भरू लागले आहेत. वास्तविक ग्राहक हा सर्वच बाजार फिरून त्याला योग्य वाटेल अशाच तेथूनच भाजीपाला खरेदी करीत असतो.

असे असतानाही प्रत्येक विक्रेता जास्त जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोचतील या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्रीसाठी ठेवतो. अशा प्रकारे भरणाऱ्या बाजारावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईनंतर या पथकाची पाठ फिरताच हे बाजार पुन्हा जैसे थे असे बसले जातात. त्यामुळे ही रस्त्यावरच्या बाजाराची समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT