A dangerous well on the Vijayanagar road. esakal
नाशिक

Nashik News : रस्त्याच्या कडेच्या विहिरी ठरू शकतात धोकेदायक; सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी

Nashik News : रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरी धोकादायक ठरू शकत असल्याने अशा विहिरी एकतर बुजून टाकाव्यात किंवा ज्या वापरात आहेत त्यांना उंच मजबूत संरक्षक कठडे बांधण्यात यावेत.

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा

देवळा : रस्त्यावरचा प्रवास असुरक्षित होत असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरी धोकादायक ठरू शकत असल्याने अशा विहिरी एकतर बुजून टाकाव्यात किंवा ज्या वापरात आहेत त्यांना उंच मजबूत संरक्षक कठडे बांधण्यात यावेत. वरून भक्कम लोखंडी जाळी ठेवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Nashik Roadside wells can be dangerous)

मेशी (धोबीघाट) येथे चार वर्षांपूर्वी विहिरीत बस व रिक्षा कोसळून मोठा अपघात झाला होता. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरींमुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो, ही बाब यामुळे अधोरेखित झाली. यामुळे रस्त्याच्या कडेला विहिरी नकोत आणि असल्या तरी त्या भक्कमरित्या उंच कठड्यांनी बांधलेल्या असाव्यात.

त्यावर लोखंडी जाळीचे झाकण असावे. कारण, रस्त्यांच्या विस्तारीकरणामुळे विहिरी आता रस्त्याच्या कडेला येवून लागल्या आहेत. वाहनांची वाढती संख्या, अतिवेग यामुळे चालकाची थोडीशी चूक महागात पडू शकते. काही विहिरी तर रस्त्याच्या कडेला अशा आहेत की येथे विहीर आहे हेही लक्षात येत नाही.

रस्त्यावरच्या अपघातापेक्षा विहिरीचा अपघात हा अधिक जीवघेणा ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात तालुक्यातील खामखेडा येथे सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अलिकडे पावसाळ्यातील पाण्याच्या साठवणुकीसाठी अनेक शेतकरी शेततळी करत असतात. (latest marathi news)

मात्र, शेततळी पूर्ण झाल्यावर त्याला कुंपण करणे, शेततळ्यावर जाण्यास प्रतिबंध होईल, अशी रचना करणे अत्यंत गरजेचे असताना या बाबीकडे दुर्लक्ष होते. आणि नेमकी यामुळेच मोठी दुर्घटना घडून जाते. शेततळ्यात बुडून मरण्याच्या घटना वाढत असल्याने याकडे ही लक्ष देण्याची गरज आहे.

"रस्त्यावरून अनेक वाहने प्रवास करत असतात. परंतु, काहीवेळा टायर फुटून म्हणा की अन्य तांत्रिक कारणामुळे म्हणा किंवा चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन भरकटू शकते. अशावेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरी धोकेदायक ठरू शकतात. म्हणून याबाबत सावधगिरी बाळगण्याची आता गरज आहे. शेततळ्यासंदर्भात पण सावधगिरी बाळगत असावी." - विष्णू शेवाळे, संस्थापक अध्यक्ष, संघर्ष समाज विकास मंडळ, रामेश्‍वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT