प्रशांत जाधव Sakal
नाशिक

Nashik Firing: RPIचे प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार

नजीकच्या एका खासगी रुग्णालयात ते सध्या उपचार घेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिडको : सामाजिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असलेले, चुकीच्या गोष्टींचा नेहमीच भांडाफोड करणारे व एका पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव यांच्यावर उत्तम नगर परिसरातील एका मेडिकल जवळ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने ते जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना नजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सिडकोतील उत्तम नगर येथील एका मेडिकल स्टोअर जवळ प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यांच्या मांडीवर पिस्तूलच्या दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळीबार नेमका कोणी केला व का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. याकरिता परिसरातील सीसी टीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे सिडको परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी शुभम पार्क येथे एका गटांमध्ये राजकीय कारणातून एकास धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून येथील पंधरा ते वीस वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली होती. त्यात आता गोळीबार झाल्याने सिडको परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

त्याने कधीही माझ्यावर शंका... मृणाल दुसानिसने पतीच्या त्या गोष्टीचं केलं कौतुक, म्हणाली- माझ्याबद्दल पझेसिव्ह असणं

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

SCROLL FOR NEXT